Home /News /money /

स्वादिष्ट अन्नावर ताव मारा आणि तोही फुकटात; कुठे आहे असा कॅफे ? जाणून घ्या !

स्वादिष्ट अन्नावर ताव मारा आणि तोही फुकटात; कुठे आहे असा कॅफे ? जाणून घ्या !

एखाद्या रेस्टॉरंट (Restaurant)मध्ये गेलात आणि चमचमीत अन्नावर बिल (Bill) न भरता ताव मारलात तर कसं वाटेल? विश्वास बसत नाही ना? अहो पण असा एक कॅफे आपल्या देशात आहे. जिथे तुम्हाला हवं तेवढं खाता येतं आणि तेही फुकटात.

    अहमदाबाद, 21 ऑक्टोबर:  आपल्या देशात असं रेस्टॉरंट (Restaurant) आहे, जिथे आपण विनामूल्य सामान्य रेस्टॉरंटप्रमाणेच मेन्यूमधून खाद्यपदार्थ मागवून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. बिल (Bill) देण्याची वेळ आल्यावर आपल्या टेबलावर रिकामा लिफाफा ठेवला जातो. या लिफाफ्यात खाद्यपदार्थांचं कोणतंही बिल नसतं, आपल्या अन्नाच्या बिलासाठी कोणीतरी आधीच पैसे दिलेले असतात. आजच्या युगात, नफा कमवण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्यांचा वापर केला जातो, पण अहमदाबादमधील 'सेवा कॅफे' लोकांना फुकटात खायला घालत आहे. सेवा कॅफेमध्ये लोक सेवाभावनेने येतात आजच्या काळात एखाद्याला रेस्टॉरंटचा व्यवसाय आवडतो कारण त्याला नफा कमवायचा असतो. परंतु सेवा कॅफे हे एक वेगळं रेस्टॉरंट आहे, जिथं सेवाभाव हा धर्म मानला जातो. गेल्या 11 वर्षांपासून हे कॅफे गिफ्ट इकॉनॉमीवर चालत आहे. हे गिफ्ट इकॉनॉमी म्हणजे काय?, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर गिफ्ट इकॉनॉमी म्हणजे, तुम्हाला खाल्ल्यानंतर बिल भरावं लागत नाही, कारण एखाद्याने आधीच तुमचं बिल भरलेलं असतं. आता आपल्याला आपल्या आवडीनुसार अन्य कोणत्याही ग्राहकासाठी भेट द्यावी लागेल. आपल्या आवडीनुसार आपण कॅफेला गिफ्ट करू शकता. गेल्या अनेक वर्षांपासून ही साखळी अशीच सुरू आहे. स्वयंसेवी संस्था चालवते हे कॅफे हे कॅफे मानव सदन आणि स्वच्छ सेवा सदन या स्वयंसेवी संस्था चालवत आहेत. मागील 11 वर्षांपासून, हे कॅफे एक पे-फॉरवर्ड पद्धत किंवा गिफ्ट इकॉनॉमी मॉडेलचं अनुसरण करते. हे कॅफे गुरुवार ते रविवार संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत किंवा 50 अतिथी पूर्ण होईपर्यंत चालू राहतं. महिन्याच्या शेवटी उत्पन्न आणि खर्च मोजल्यावर मिळणारे उत्पन्न चॅरिटीच्या फंडात दिलं जातं. स्वयंसेवकांच्या मदतीने चालतं रेस्टॉरंट हे कॅफे पूर्णपणे स्वयंसेवकांच्या मदतीनी चालतं. विद्यार्थी, व्यावसायिक, पर्यटकसुद्धा या कॅफेमध्ये विनामूल्य काम करतात. आपण येथे स्वयंसेवक होऊ इच्छित असल्यास या कॅफेमध्ये आपलं कौशल्य दाखवू शकता. स्वयंपाकापासून जेवण सर्व्ह करणं ते अगदी डिशेस धुवेपर्यंत जे आपल्याला आवडेल ते आपण करू शकता. सेवा कॅफेचे व्यवस्थापक म्हणतात, “सेवा कॅफे ही एक कल्पना आहे. जिथं स्वयंसेवक येतात आणि अतिथि देवो भव: या भावनेनी लोकांना खायला घालतात. अतिथि देवो भव: भावनेनी भारावलेल्या अन्नाची किंमत कोणीही ठरवू शकत नाही". महागाईच्या या युगात देशात असं रेस्टॉरंट असणं खरोखर कौतुकास्पद आहे. आपणास सेवा कॅफेमध्ये जायचं असेल आणि सेवेचा आनंद घ्यायचा असेल तर अहमदाबादच्या सीजी हायवे रोडवरील म्युनिसिपल मार्केटसमोर असलेल्या या कॅफेला भेट द्या. या कॅफेमध्ये आपल्याला असं उत्तम आतिथ्य अनुभवता येईल ज्याची चर्चा आता संपूर्ण देशात सुरू झाली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Gujrat, Restaurant

    पुढील बातम्या