मराठी बातम्या /बातम्या /मनी /सप्टेंबरमध्ये पैसे कमावण्याची सुर्वणसंधी, गुंतवणुकीसाठी दोन नवे जबरदस्त पर्याय; जाणून घ्या कोणते ते

सप्टेंबरमध्ये पैसे कमावण्याची सुर्वणसंधी, गुंतवणुकीसाठी दोन नवे जबरदस्त पर्याय; जाणून घ्या कोणते ते

 कोरोना काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाल्यानंतर लोकांना गुंतवणुकीचं (Importance of Investment) महत्त्व अधिक ठळकपणे पटू लागलं आहे.

कोरोना काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाल्यानंतर लोकांना गुंतवणुकीचं (Importance of Investment) महत्त्व अधिक ठळकपणे पटू लागलं आहे.

कोरोना काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाल्यानंतर लोकांना गुंतवणुकीचं (Importance of Investment) महत्त्व अधिक ठळकपणे पटू लागलं आहे.

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: आपले पैसे नुसतेच साठवण्यापेक्षा ते गुंतवणं कधीही चांगलं, असं कित्येक अर्थतज्ज्ञ सांगत असतात. एफडी, किंवा बँकेतील व्याजावर मिळणाऱ्या नफ्यापेक्षा शेअर मार्केट (Share Market tips) किंवा अशाच अन्य ठिकाणी आपले पैसे गुंतवले, तर त्यातून जास्त नफा मिळू शकतो. कोरोना काळामध्ये कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाल्यानंतर लोकांना गुंतवणुकीचं (Importance of Investment) महत्त्व अधिक ठळकपणे पटू लागलं आहे. त्यामुळे लोक आता शेअर मार्केटमध्ये (Share Market Investment) गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने विचार करू लागले आहेत. यातच कित्येक कंपन्या आपले शेअर्स आयपीओच्या (IPO) माध्यमातून सर्वसामान्यांसाठीही खुले करत आहेत.

तुम्ही जर पुढच्या महिन्यात कुठे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दोन कंपन्यांचे आयपीओ (September new IPO) शेअर मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा मिळवू शकाल. यामध्ये हेल्थकेअर कंपनी असलेली विजया डायग्नोस्टिक (Vijaya Diagnostic IPO), आणि केमिकल्स बनवणारी कंपनी एमी ऑर्गेनिक्स (Ami Organics IPO) या कंपन्यांचा समावेश आहे. एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरदरम्यान या दोन्ही कंपन्यांचे आयपीओ खुले असणार आहेत.

विजया डायग्नॉस्टिकची देशभरात हेल्थकेअर चेन आहे. एवढ्या मोठ्या कंपनीच्या आयपीओची (Vijaya Diagnostic IPO Base price) बेस प्राईज 522 ते 531 रुपये प्रति शेअर असणार आहे. हा पूर्णपणे ओएफएस, म्हणजेच ओपन फॉर सेल (OFS) असणार आहे. यात प्रमोटर आणि इन्व्हेस्टर्स 3,56,88,064 इक्विटी शेअर्स विकतील. यात एका लॉटची साईज 28 शेअर्स असणार आहे. म्हणजेच, 522 ते 531 रुपये प्रति शेअर दराने तुम्हाला कमीत कमी 14,616 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम: गुंतवा अवघे 50 हजार आणि खात्यात जमा होईल 'इतकी' पेन्शन

एमी ऑर्गेनिक्स कंपनीच्या इश्यूसाठी 603 ते 610 रुपये प्रति शेअर (Ami Organics IPO base price) एवढी किंमत नक्की करण्यात आली आहे. आयपीओच्या माध्यमातून 570 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा निर्धार आहे. यासाठी कंपनी आयपीओमध्ये 200 कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. तसेच, आपल्या आयपीओची साईजही कंपनीने 100 कोटी रुपयांनी कमी केली आहे. एमी ऑर्गेनिक्सच्या एका लॉटची साईज 24 शेअर्स असणार आहे. म्हणजेच, 603 ते 610 रुपये प्रति शेअर दराने तुम्हाला कमीत कमी 14,472 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

Rules Changing from 1st September: 1 सप्टेंबपासून बदलणार रोजच्या जीवनातील हे 8 महत्त्वाचे नियम, जाणून घ्या अन्यथा खिशाला बसेल फटका

 या दोन्ही कंपन्यांबाबत माहिती घेऊन, त्यांच्या भविष्यातील वाढीचा अंदाज बांधणे शक्य आहे. असं करुन, योग्य त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला येत्या काळात कमी गुंतवणुकीतही मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो.

First published:

Tags: Money, Share market