शेअर बाजारात दिवाळीनंतर धमाका; सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उंचीवर!

शेअर बाजारात दिवाळीनंतर धमाका; सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उंचीवर!

देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सकारात्मक वातावरणाचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील दिसून आले. परदेशी गुंतवणूकीचा वाढणारा वेग आणि देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक वातावरण यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला.

गुरुवारी बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 263.69 अंकांच्या तेजीसह खुला होत तो 40 हजार 344.99 अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील 71.85 अंकांची वाढ होत तो 11 हजार 915.95 अंकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, टाटा मोटर्स, यस बँक आणि सनफार्मा या कंपन्यांचे समभाग 4.35 टक्केपर्यंत नफ्यात होते. तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा स्टील, टेकएम, पावरग्रीड आणि अॅक्सिस बँकचे शेअर 1.09 टक्के तोट्यात होते.

दुपारी साडेबारा वाजता सेन्सेक्स 163 अंकांच्या तेजीसह 40 हजार 214 अंकांवर होता तर निफ्टीमधील आघाडीचे 50 समभाग 56 अंकांच्या तेजीसह 11 हजार 899 अंकावर होता. निफ्टीचा निर्देशांक त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च कामगिरीच्या जवळ पोहोचला आहे. भारतीय शेअर बाजारात 4 जून 2019 नंतर प्रथमच तेजी पाहायला मिळाली आहे. 4 जून रोजी नव्या विक्रमावर पोहोचला होता. या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 4 टक्क्यांनी वधारला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 31, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading