निवडणूक निकालाच्या अगोदर शेअर बाजाराला सतावतेय 'ही' चिंता

निवडणूक निकालाच्या अगोदर शेअर बाजाराला सतावतेय 'ही' चिंता

एक्झिट पोलच्या निकालानंतर खूश झालेल्या शेअर बाजारात आता चिंता जाणवायला लागलीय.

  • Share this:

मुंबई, 22 मे : एक्झिट पोलच्या निकालानंतर खूश झालेल्या शेअर बाजारात आता चिंता जाणवायला लागलीय. निवडणूक निकालाआधी एक दिवस सेन्सेक्स-निफ्टी वधारून बंद झाली. पण दिवसभर गुंतवणूकदारांच्या मनात संशय होताच. म्हणून सुरुवातीला काही मिनिटांनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. शेवटी बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स 140 अंकांनी वधारून 39,110वर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सवाला इंडेक्स सेन्सेक्स 140 अंकांनी वधारून 39,110वर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सचा मुख्य इंडेक्स निफ्टी 29 अंकांनी वधारून 11,737वर बंद झाला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 23 मे रोजी छोट्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करू नये. बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसतील.

नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 'या' कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

बाजारात होत आहेत बदल - रविवार ( 19 मे )च्या एक्झिट पोलच्या निकालानंतर बाजारात खूप उत्साह दिसला. सोमवार ( 20 मे ) रोजी मुख्य बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स सातव्या आसमानात पोचला. पण मंगळवारी ( 21 मे ) नफा वसुलीला सूचकांकांना लाल निशाणीवर पोचवलं. मंगळवारी बाजाराच्या स्थितीवरून कळलं की फक्त केंद्रात स्थिर सरकार येऊन शेअर बाजाराच्या अडचणी काही संपत नाहीत.

शेअर बाजाराला सतावतायत चिंता

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अर्थव्यवस्था कमकुवत होतेय. कंपनींच्या कमाईत वाढ होण्याची आशा कमी आहे. NBFC सेक्टरचं संकट कमी होत नाहीय. या सगळ्यांचा परिणाम निवडणुकांचे ढग विरल्यानंतर येणाऱ्या महिन्यांत बाजारावर पडू शकतो.

फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, बाकीची मदत करेल सरकार

बाजारासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे सुस्त पडलेली अर्थव्यवस्था. कंपनींच्या कमाईत कमकुवतपणा आणि जास्त व्हॅल्युएशनचा परिणाम होतोय.

सरकारवर आर्थिक दबाव वाढतोय. सरकारच्या रिव्हेन्यूमध्ये जास्त वाढ झाल्याबद्दल संशय आहे. गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे की अर्थव्यवस्थेत सुधारणा कधी आणि कशी होणार? फंड मॅनेजर्सचं म्हणणं आहे की संबंधित कंपन्याही खर्च करण्यासाठी मागे-पुढे करतायत. कारण प्रमोटर्सही कर्जात बुडालेत.

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

गुंतवणुकीच्या जगात स्थिरतेला महत्त्व आहे. आता सरकार कोणाचं बनतंय आणि अर्थव्यवस्था पटरीवर कशी आणली जातेय, हे बघणं महत्त्वाचं आहे.

ब्रोकर्सचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणूक निकालासाठी ब्रोकर्सही तयार आहेत. बाजारात चढउतार पाहता ब्रोकर्सनं मार्जिन सीमा 20-30 टक्के वाढवलीय. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर बाजारात चढउतार होण्याची शक्यता पाहता मार्जिन सीमा वाढवली गेलीय. पोर्टफोलिओच्या समोर ट्रेंडिगची सीमाही कमी केलीय.

VIDEO : प्रकाश आंबेडकर अशोक चव्हाणांवर भडकले, केला गंभीर आरोप

First published: May 22, 2019, 5:56 PM IST

ताज्या बातम्या