शेअर बाजारात तेजी, पहिल्याच दिवशी निर्देशांक हजारांनी वधारले

शेअर बाजारात तेजी, पहिल्याच दिवशी निर्देशांक हजारांनी वधारले

गेल्या आठवड्यात शुक्रवारी निर्देशांकात विक्रमी वाढ झाली होती. त्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा उसळी घेतली.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात निर्देशांकाने 1 हजार 313 अंकांनी उसळी घेतली. निफ्टी 280 अंकांनी वधारला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स 1 हजार 921 अंकांनी वधारला होता. गेल्या एक दशकातील ही उच्चांकी वाढ होती. शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कार्पोरेट कराच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती.

शुक्रवारी सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा मंदीचे वातावरण होते. पण अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्के करण्यात आला आहे. या घोषणेनंतर बँक निफ्टी, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्समधील शेअरमध्ये तेजी आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात शेअर बाजारातील या तेजीने आणखी वेग पकडला. दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली होती. यामुळे गुंतवणुकदारांनी एका तासात 5 लाख कोटी रुपये कमावले.

BSEने दिलेल्या माहितीनुसार बाजारात तेजी आल्यानंतर काही मिनिटातच बाजारमुल्य 143.45 लाख कोटींवर पोहोचले. हेच बाजारमुल्य गुरुवारी 138.54 लाख कोटी इतके होते. याचाच अर्थ बाजार मुल्यात 5 लाख कोटींची वाढ झाली. BSEचा इतिहास पाहता 10 वर्षात प्रथमच एका दिवसात सेन्सेक्समध्ये 2 हजार अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये देखील 500 अंकांची वाढ होत तो 11 हजार 250वर पोहोचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

First published: September 23, 2019, 10:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading