एकाच दिवसात बुडले 2.64 लाख कोटी; विधानसभेच्या निकालांआधीच सेन्सेक्स गडगडला

विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्याअगोदरच सोमवारी सकाळी शेअर बाजार दणकन आपटला. सेन्सेक्स 600 अंकांनी आणि निफ्टी 200 अंकानी कोसळला.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 04:58 PM IST

एकाच दिवसात बुडले 2.64 लाख कोटी; विधानसभेच्या निकालांआधीच सेन्सेक्स गडगडला

मुंबई, 10 डिसेंबर : विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्याअगोदरच सोमवारी सकाळी शेअर बाजार दणकन आपटला. सेन्सेक्स 600 अंकांनी आणि निफ्टी 200 अंकानी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे 2.64 लाख कोटी रुपये बुडाले.

BSEचा इंडेक्स 713 अंकांनी पडला आणि 34960वर बंद झाला. निफ्टी निर्देशांकही 205 अंकांनी पडला. शेअर बाजार बंद झाला त्या वेळी 10,488 अंकांवर निफ्टी निर्देशांक होता.

एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात निकाल लागण्याची चिन्हं दिसत असल्यानं शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या- मंगळवारी लागणार आहेत. त्याअगोदर शुक्रवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार भाजपची राजस्थानची सत्ता धोक्यात असल्याचं दिसतंय. तसंच मध्य प्रदेशातही काँग्रेसनं तगडं आव्हान निर्माण केलंय. तेलंगणात भाजपला अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याची चर्चा शुक्रवारपासून सुरू होती. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचे आकडे सोमवारी सकाळी बाजार उघडल्याबरोबरच कोसळले.

फक्त निवडणुका हाच मुद्दा नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्यामुळे त्याचाही परिणाम जगभरातल्या वित्त बाजारावर झाल्याचं दिसतं.

चीन आणि अमेरिका यांच्यामधलं ट्रेड वॉर पुन्हा मोठं होतंय त्यामुळे अनेक अर्थतज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. त्यातच बँकांचे शेअर कोसळत आहेत. त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...