आता ज्येष्ठ नागरिकांना मेडिकल इन्शुरन्स नसला तरी मिळेल दिलासा

आता ज्येष्ठ नागरिकांना मेडिकल इन्शुरन्स नसला तरी मिळेल दिलासा

उतारवयात मेडिकल इन्शुरन्स काढायला गेलं तर त्याचा हप्ता खूप मोठा असतो. पण आता ज्येष्ठ नागरिकांना असा होणार फायदा

  • Share this:

मुंबई, 18 मे : हल्ली मेडिकल इन्शुरन्स सगळेच जण काढतात. पण प्रश्न असतो तो ज्येष्ठ नागरिकांचा. त्यांनी त्यांच्या तरुणपणी आरोग्य विमा काढलेला नसतो. म्हातारपणी जेव्हा आजारपण येतं, हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागतं तेव्हा मग आर्थिक संकट समोर दिसतं. बचत केलेल्या पैशांतून खर्च करावा लागतो. पण आता ज्येष्ठ नागरिकांना दिलासा आहे.

आता इंटरनेटशिवाय BHIM App च्या मदतीनं करा पैसे ट्रान्सफर, 'हे' आहेत फीचर्स

सीएनबीसी आवाजवरच्या माहितीनुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपला विमा काढला नसेल त्यांनी केलेल्या वैद्यकीय खर्चावर कलम 80C अनुसार कर सवलत मिळू शकते. ही मर्यादा 50 हजारापर्यंत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत: वैद्यकीय खर्च केला असला तर त्यांना आणि त्यांच्या मुलांनी खर्च केला असेल तर मुलांनाही ही कर सवलत मिळू शकेल.

वैद्यकीय खर्चामध्ये काय काय येतं?

यामध्ये डाॅक्टरांचा सल्ला, औषधांचा खर्च, वैद्यकीय उपचार या गोष्टी येतात. तुम्ही सर्दी-खोकल्यासाठी डाॅक्टरांकडे गेलात तरीही त्या खर्चावर तुम्हाला कर सवलत मिळू शकते. तसंच वैद्यकीय उपचारामध्ये फिजिओथेरपी, दातावरची ट्रिटमेंट, डोळ्यांवरचे उपचार अशा गोष्टीही येतात, असं तज्ज्ञ सांगतात.

'या' 5 गोष्टींमुळे तुमच्या बचतीत होईल वाढ

फक्त ज्येष्ठ नागरिकांची कमाई टॅक्सेबल असता कामा नये. आई-वडिलांच्या उपचारासाठीच्या खर्चात करसवलत त्यांची मुलंही घेऊ शकतात.

ऑफिसमधली उद्धट वागणूक असते संसर्गजन्य? काय सांगतोय हा रिसर्च?

हल्ली तरुण पिढी आरोग्य विमा काढतेच. पण आधीच्या पिढीला मेडिकल इन्शुरन्स म्हणजे पैसे वाया घालवणं वाटायचं. उतारवयात त्याचं महत्त्व कळल्यावर जर इन्शुरन्स काढायला गेलं तर त्याचा हप्ता खूप मोठा असतो. मग सगळंच कठीण होऊन जातं. अशात कर सवलतीच्या सुविधेमुळे त्यांना दिलासा मिळालाय.

VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

First published: May 18, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या