नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: आयकर विभाग (Income Tax Department) ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष कर सुविधा देत आहे. या स्पेशल टॅक्स सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे वय 60 ते 80 वर्ष दरम्यान असलं पाहिजे. त्याचबरोबर 80 वर्षांवरील लोकांना सुपर सीनियर सिटीजनमध्ये स्थान दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्या प्रकारे फायदे मिळतात ते पाहूयात.
अधिक फायदे उपलब्ध
सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आयकरात अधिक सूट मिळते. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक नसतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर सुपर सीनियर सिटीजनसाठी ही मर्यादा 5 लाखांपर्यंत आहे. सूट मर्यादेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत 50 हजार रुपयांचा जास्त लाभ मिळतो आणि ही रक्कम करामध्ये येत नाही. याशिवाय जर बँकेने मुदत ठेवीसाठी टीडीएस (TDS) कापला असेल तर फॉर्म 15G/H भरुन इन्कम टॅक्स रिटर्न मिळवता येतो.
आरोग्य विमा प्रीमियमवर कर सवलत
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आरोग्य विम्यासाठी 50 हजार रुपयांचा प्रीमियम भरला असेल तर त्यावर कर आकारला जात नाही.
(हे वाचा-सबसिडी नसणाऱ्या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, अशाप्रकारे करा बुकिंग)
ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज नाही
आयटी कायद्याच्या कलम 208 नुसार ज्या व्यक्तीचा कर दरवर्षी दहा हजार किंवा त्याहून अधिक आहे, त्याला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना येथे सूट देण्यात आलेली आहे. कलम 207 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरणं आवश्यक नाही. इन्कम टॅक्स वेबसाईटनुसार ज्येष्ठ नागरिक व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून पैसे कमवत नसेल तर त्याला ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज नाही.
(हे वाचा-देशातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये मोदी सरकार पाठवत आहे 1.24 लाख रुपये?)
व्याज उत्पनावर लाभ
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80TTB नुसार सामान्य नागरिकांना बँका, टपाल कार्यालय आणि सहकारी बँकांकडून मिळणाऱ्या व्याजापोटी 50 हजार रुपये पर्यंतचा ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पनावर कराची तरतूद आहे. बचत ठेव आणि मुदत ठेव दोन्हीवर कर कापला जातो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी कलम 194A अंतर्गत 50 हजार रुपये ठेवीच्या व्याज म्हणून सरकारी बँकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणतेही कर आकारले जात नाहीत.