Home /News /money /

Investment Tips : सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्याची संधी, भारत बाँड ETF उद्या उघडणार

Investment Tips : सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्याची संधी, भारत बाँड ETF उद्या उघडणार

भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंडचा (Bharat Bond ETF Third Tranche) तिसरा टप्पा 3 डिसेंबर रोजी उघडेल. भारत बाँड ईटीएफ हा वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा (DIPAM) उपक्रम आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : शेअर बाजारातील (Share Market) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीची (Safe Investment) संधी गुंतवणूकदारांना मिळत आहे. भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंडचा (Bharat Bond ETF Third Tranche) तिसरा टप्पा 3 डिसेंबर रोजी उघडेल. भारत बाँड ईटीएफ हा वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा (DIPAM) उपक्रम आहे. सामान्य गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो. भारत बाँड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचा दुसरा टप्पा तीनपेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला. भारत बाँड ईटीएफचा दुसरा टप्पा जुलै, 2020 मध्ये सादर करण्यात आला आणि त्याला तीनपट पेक्षा जास्त सबस्क्रिप्शन मिळाले आहेत. यातून 11,000 कोटी जमा झाले. डिसेंबर 2019 मध्ये, पहिल्या टप्प्यात 12,400 कोटी रुपये उभारण्यात आले होते. एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंटने (Edelweiss Mutual Fund) सांगितले की, भारत बाँड ईटीएफच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या विकास योजनेसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी सरकार 5,000 कोटी रुपये उभे करू शकते. भारत बाँड एक्सचेंज ट्रेडेड फंड 3 डिसेंबरला उघडेल आणि 9 डिसेंबरला बंद होईल. हा ETF 15 एप्रिल 2032 रोजी मॅच्युअर होईल. भारत बाँड ईटीएफ एडलवाइज म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित केले जाते. त्याच्या व्यवस्थापनाखाली 36,359 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर 'AAA' रेटेड बाँडमध्ये गुंतवणूक Bharat Bond एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करते. हा ETF फक्त 'AAA' रेटिंग असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बाँडमध्ये गुंतवणूक करतो. नवीन फंड ऑफरिंगचा मूळ आकार (NFO) 1,000 कोटी असेल. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते. हा बाँड अतिशय सुरक्षित मानला जातो, कारण एक तर तो सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि दुसरे म्हणजे त्याला AAA रेटिंग असते. Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे ईटीएफ. म्युच्युअल फंडाप्रमाणे, ETF हा सिक्युरिटीजचा एक समूह आहे. ईटीएफ शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केला जातो. ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखे असतात. परंतु कोणत्याही स्टॉकप्रमाणे, ईटीएफ स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी किंवा विकला जाऊ शकतो. तुम्ही एक्सचेंजच्या ट्रेडिंग तासांदरम्यान ETF खरेदी आणि विक्री देखील करू शकता. ईटीएफ प्रथम एनएफओ (New Fund Offer) म्हणून ऑफर केले जातात. मग हे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होतात. ट्रेडिंग पोर्टल्स किंवा स्टॉक ब्रोकर्सद्वारे स्टॉक मार्केटमध्ये ईटीएफची खरेदी आणि विक्री केली जाते. देशात इक्विटी ईटीएफ, डेट ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफमध्ये ट्रेडिंग केले जाते. ईटीएफचा परतावा आणि जोखीम बीएसई सेन्सेक्स किंवा सोन्यासारख्या निर्देशांकांच्या अस्थिरतेवर अवलंबून असतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या