मराठी बातम्या /बातम्या /मनी /लॉजिस्टिक कंपनी Delhivery च्या IPO ला सेबीची मंजुरी; कंपनी 7460 कोटी उभारणार

लॉजिस्टिक कंपनी Delhivery च्या IPO ला सेबीची मंजुरी; कंपनी 7460 कोटी उभारणार

Delhivery ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनीचे देशभरात नेटवर्क आहे. 30 जून 2021 पर्यंत उपलब्ध डेटानुसार, ते 17045 पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) कोडमध्ये सेवा प्रदान करते.

Delhivery ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनीचे देशभरात नेटवर्क आहे. 30 जून 2021 पर्यंत उपलब्ध डेटानुसार, ते 17045 पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) कोडमध्ये सेवा प्रदान करते.

Delhivery ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनीचे देशभरात नेटवर्क आहे. 30 जून 2021 पर्यंत उपलब्ध डेटानुसार, ते 17045 पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) कोडमध्ये सेवा प्रदान करते.

मुंबई, 14 जानेवारी : सप्लाय चेनमधील दिग्गज कंपनी Delhivery च्या IPO ला भांडवली बाजार नियामक SEBI ने ग्रीन सिग्नल दिला आहे. कंपनीचा IPO 7460 कोटी रुपयांचा असेल. Delhivery वर्षातील पहिली टॉप टायर स्टार्टअप कंपनी बनली आहे जिच्या IPO ला SEBI ने मान्यता दिली आहे.

IPO द्वारे जमा होणारा पैसा ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक वाढीसाठी आणि अधिग्रहणांद्वारे इतर धोरणांसाठी वापरला जाईल. याशिवाय कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीही हा निधी वापरला जाईल.

2460 कोटी शेअर्स विकले

इकॉनॉमिक टाईम्सने आयपीओच्या मंजुरीबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे. नोव्हेंबरमध्ये सॉफ्टबँक (SoftBank) आणि कार्लाइल (Carlyle) बेस्ड Dlehivery यांनी दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, सध्याचे भागधारक 2460 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकतील. 5000 कोटी रुपये जमा करण्याचा कंपनीचा मानस आहे. सॉफ्टबँकचा व्हिजन फंड आणि कार्लाइल यांच्याशिवाय टाइम्स इंटरनेटचे नावही शेअर्स विकणाऱ्या शेअरधारकांच्या यादीत आहे. SEBI ला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने कोटक महिंद्रा कंपनी, BofA सिक्युरिटीज इंडिया, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया यांना या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केल्याचे म्हटले होते.

Dlehivery चे नेटवर्क देशभर

ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनीचे देशभरात नेटवर्क आहे. 30 जून 2021 पर्यंत उपलब्ध डेटानुसार, ते 17045 पोस्टल इंडेक्स नंबर (पिन) कोडमध्ये सेवा प्रदान करते. जून 2021 च्या तिमाहीत, त्याने सुमारे 21342 सक्रिय ग्राहकांना सप्लाय चेन उपाय प्रदान केले आहेत. कंपनीने FMCG, कंझ्युमर ड्युरेबल्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, लाइफस्टाइल, रिटेल, ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग वर्टिकलमध्ये सोल्यूशन्स प्रदान केले.

First published:

Tags: Investment, Money, Share market