घर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार

घर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार

Supreme Court, Home Buyers - घर खरेदी करणाऱ्यांना आता सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : सुप्रीम कोर्टानं घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आणलीय. सरकारनं घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक क्रेडिटर्सचा दर्जा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिलीय. घर खरेदी करणारे आता बिल्डरकडे आपला हक्क मागू शकतात, तसंच बँकाही त्यांचं कर्ज मागू शकतात.

Insolvency and Bankruptcy Code च्या खाली घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक क्रेडिटर्सचा दर्जा दिला गेलाय. घर खरेदी करणाऱ्यांना आता क्रेडिटर्सच्या कमिटीत आपलं मत मांडण्याची संधी मिळेल. त्याचं मत विचारात घ्यावंच लागेल.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 113 महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे

गेल्या वर्षी सरकारनं कलम 5 (8)(f) आणलं होतं. त्यानुसार घर खरेदी करणारे बिल्डर विरोधात जाऊ शकतात. बिल्डरनं घर बांधायला सुरुवात केली आणि ते पूर्ण केलं नाही तर बिल्डरला घर खरेदी करणाऱ्यांना रिटर्न द्यावे लागतील. सुप्रीम कोर्टानं यावर आपली मोहोर उमटवलीय.

पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

तसंच, बिल्डरला दिवाळखोरीमुळे आपली संपत्ती विकावी लागली तर त्यातले पैसे घर खरेदी करणाऱ्यांना मिळतील. त्याआधी किती जणांना पझेशन मिळालं नाही, किती जणांचं देणं बाकी आहे, हे पाहिलं जाईल.

बिल्डरवर किती कर्ज आहे, संपत्ती विकल्यानंतर त्याच्याकडे त्यातले किती उरतात, त्यानंतर घर खरेदी करणाऱ्यांना किती देता येतील हे बँका आणि तज्ज्ञांशी बोलून ठरवलं जाईल.

काॅलेज विद्यार्थ्यांना एका मिनिटात 'इथे' मिळेल कर्जापासून नोट्सपर्यंत सर्व काही

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय. अनेकदा बिल्डर्स बिल्डिंग बांधण्यात बराच वेळ घालवतात. अनेकदा ते पूर्णही करत नाहीत. यात घर खरेदी करणाऱ्यांचे पैसे गुंतलेले असतात. आता मात्र बिल्डरला घर खरेदी करणाऱ्यांना त्यांचे पैसे द्यावे लागतील.

पहिल्यांदा उघडले सरदार सरोवर धरणाचे दरवाजे, पाहा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: August 9, 2019, 4:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading