Elec-widget

'या' बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळतो FD पेक्षा जास्त फायदा

'या' बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये मिळतो FD पेक्षा जास्त फायदा

SBI, RBI, Bank, Saving Account - तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमुळे जास्त फायदा झाला तर? जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतातच. त्यावर तुम्हाला जास्त फायदा मिळाला तर? देशातली मोठी सरकारी बँक SBIनं ग्राहकांसाठी बऱ्याच नव्या योजना सुरू केल्या. आपण जाणून घेऊ SBI च्या एका खास अकाउंटबद्दल-

SBIचं सेव्हिंग प्लस अकाउंट (SBI Savings Plus Account) मल्टी ऑप्शन डिपाॅझिट ( MOD )शी लिंक होतं. यात सरप्लस अमाउंट एका ठरलेल्या मर्यादेपर्यंत जास्त झाली तर स्वत:च फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर होते. जाणून घेऊ या खात्याची खासीयत -

सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली, 'हे' आहेत शुक्रवारचे दर

कोण उघडू शकतो हे अकाउंट? - SBI चे हे सेव्हिग्स प्लस अकाउंट कुणीही उघडू शकतं. यामध्ये तुम्ही तुमच्या साथीदारालाही भागीदार करू शकतात. ते सिंगल किंवा जाॅइंट रूपात उघडता येतं.

किती रक्कम ठेवावी लागेल?- या अकाउंटमध्ये महिन्याला रक्कम मर्यादा ठेवण्यात आली आहे. शहरी आणि उपनगरीय भागात 3000 ते 2000 रुपये ठेवावे लागतील. तर ग्रामीण भागात 1000 रुपये मर्यादा आहे. या अकाउंटमध्ये एसबीआयच्या बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळणार आहे.

Loading...

ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची संधी, पदासाठी आहेत किमान 'या' अपेक्षा

किती रक्कम ट्रान्सफर करू शकता? - सेव्हिंग्स प्लस अकाउंटमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम फिक्स्ड डिपॉजिटमध्ये ट्रान्सफर करता येते. कमीत कमी तुम्ही 10, 000 रुपयेही ट्रान्सफर करू शकतात. याची अधिक मर्यादाही 35,000 हजार आहे.

'अशा' प्रकारे भरू शकता फक्त 7 मिनिटांत ITR, इन्कम टॅक्सची नवी सुविधा

कोणत्या सुविधा मिळणार? - या अकाउंटमध्ये एटीएम कार्ड,मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट सारख्या सुविधा मिळणार आहे. तसंच मल्टी ऑप्शन डिपॉजिट्सवर कर्जाची सुद्धा सेवा मिळणार आहे.

बँक तुमच्या खात्यातल्या जास्त पैशांचं फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये रूपांतर करून ग्राहकांच्या फायद्याचाच विचार करते.

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Aug 2, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...