SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का, 1 नोव्हेंबरपासून होणार हा बदल

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का, 1 नोव्हेंबरपासून होणार हा बदल

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. SBI सेव्हिंग अकाउंटवर मिळणारं व्याज कमी करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. SBI सेव्हिंग अकाउंटवर मिळणारं व्याज कमी करणार आहे. ही व्याजकपात 1 नोव्हेंबर 2019 पासून लागू होईल.

SBI एक लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्याची कपात करणार आहे. एक नोव्हेंबरपासून 1 लाख रुपयांच्या ठेवींवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरून सव्वातीन टक्क्यांवर येईल.

FD वरचे व्याजदर आधीच कमी

या महिन्यात RBI ने पॉलिसी रेट्समध्ये पाचव्यांदा कपात केली आहे. यानंतर SBI ने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. 10 ऑक्टोबरला FD मध्ये व्याजदरात कपात करण्यात आली होती.

SBI ने 10 ऑक्टोबरपासून 2 कोटींपेक्षा अधिक रकमेवरचे व्याजदर कमी केले होते.

(हेही वाचा : PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय)

कर्ज झालं स्वस्त

SBI ने 10 ऑक्टोबरपासून कर्जही स्वस्त केलं आहे. घरासाठीचं कर्ज आणि वाहनकर्जही स्वस्त झालं आहे.

(हेही वाचा : नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळंच महाग,पाकमध्ये भूकबळी जाण्याचा धोका)

==========================================================================================

VIDEO : राज ठाकरेंची शेवटच्या सभेत भावनिक साद, म्हणाले...

First published: October 19, 2019, 6:37 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading