खूशखबर! SBI होमलोन ग्राहकांना देणार भेट, EMI होऊ शकतो कमी

खूशखबर! SBI होमलोन ग्राहकांना देणार भेट, EMI होऊ शकतो कमी

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया होमलोन धारकांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. होमलोनवरचा EMI कमी करण्याचा SBI चा विचार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया होमलोन धारकांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे याचा फायदा होमलोन धारकांना मिळू शकतो. होमलोनवरचा EMI कमी करण्याचा SBI चा विचार आहे. यामुळे SBI च्या लाखो होमलोन धारकांना दिलासा मिळणार आहे.

यावर्षी जुलै महिन्यात SBI ने नव्या होमलोनसाठी रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची घोषणा केली होती. सरकारने रेपो रेट कमी केला तर होमलोनच्या व्याजदरातही कपात करण्यात येईल, असा या घोषणेचा अर्थ होता.

जुन्या ग्राहकांनाही मिळणार लाभ

सध्या या योजनेचा लाभ नव्या होमलोन ग्राहकांना मिळू शकेल. त्याचबरोबर आता जुन्या ग्राहकांनाही याचा फायदा कसा मिळेल याची आम्ही तपासणी करत आहोत, असं स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं.

रेपो रेटच्या कपातीनुसार व्याजदर आकारायचे झाले तर SBI चे ग्राहक 8.05 किंवा 8.20 टक्के या दराने घरासाठी कर्ज घेऊ शकतात.

सामान्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार माफ करणार कर्ज

सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया 75 लाख रुपयांपर्यंतचं होमलोन 8. 35 टक्के ते 8.90 टक्के एवढ्या दराने दिलं जातं.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याने बँकांनीही त्याचा फायदा ग्राहकांना करून द्यावा, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने वारंवार केलं आहे. आता SBI ने हे पाऊल उचलल्यानंतर इतर बँकांनीही गृहकर्जावरचा व्याजदर कमी करावा, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.

===================================================================================================

VIDEO : कोहिनूर प्रकरणी उन्मेश जोशी ईडीच्या चौकशीला जाण्याआधी म्हणाले...

Published by: Arti Kulkarni
First published: August 19, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading