SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

SBI डेबिट कार्ड रद्द करण्याच्या तयारीत, असे काढता येणार पैसे

देशभरात सध्या 90 कोटी डेबिट कार्डस आणि 3 कोटी क्रेडिट कार्ड वापरली जातात. पण आता डिजिटल पेमेंटमुळे ही कार्ड इतिहासजमा होऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंटमध्ये आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर गृहितच धरतो. पण आता डेबिट कार्डही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.देशातली सगळ्यात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना यशस्वी झाली तर सगळीकडे दिसणारी प्लॅस्टिकची डेबिट कार्ड रद्द होतील. SBI डेबिट कार्डच्या ऐवजी डिजिटल पेमेंट सिस्टीम आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

देशात 90 कोटी डेबिट कार्ड

देशभरात सध्या 90 कोटी डेबिट कार्डस आणि 3 कोटी क्रेडिट कार्ड वापरली जातात. पण आता डिजिटल पेमेंटमुळे ही कार्ड इतिहासजमा होऊ शकतात. यासाठी एसबीआय योनो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी या उपक्रमाबदद्ल माहिती दिली.

Yono मुळे काम होईल सोपं

Yono प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येतील त्याचबरोबर खरेदीही करता येईल. SBI ने याआधी 68 हजार कॅशपॉइंट्स तयार केले आहेत. पुढच्या दीड वर्षात असे 10 लाख कॅशपॉइंट्स तयार करण्यात येतील, असं रजनीश कुमार यांनी सांगितलं.

देशात वर्षभरात 1.10 कोटी लोकांचा रोजगार गेला, अर्थव्यवस्थेबद्दल चिंता

स्टेट बँक ऑफ इंडियाने यावर्षीच्या मार्च महिन्यात योनो कॅश सेवा सुरू केली आहे. यामुळे डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा मिळते. ही पद्धत सोपीही आहे आणि सुरक्षितही आहे. सुरवातीला ही सुविधा 16 हजार 500 ATM मध्ये मिळत होती. आता सगळीच ATM अपडेट केली जातील.

======================================================================================================

राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या