मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI ने 44 कोटी ग्राहकांना केलं Alert! 30 जूननंतर नाही चालणार असं पॅनकार्ड

SBI ने 44 कोटी ग्राहकांना केलं Alert! 30 जूननंतर नाही चालणार असं पॅनकार्ड

sbi

sbi

SBIने TWEET करून ग्राहकांना 30 जूनपूर्वी हे काम करायला सांगितलं आहे.

नवी दिल्ली, 3 जून: - जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (State Bank Of India) ग्राहक ( customer ) असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट (alert) केलंय.  बँकेने यासंदर्भात एक ट्विट केलं असून ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड (PAN card) आणि आधार कार्ड (Aadhar card)   लिंक (PAN Aadhar link)  करून घेण्यास सांगितलं आहे.  अन्यथा ट्रॅन्झॅक्शनमध्ये ( transaction) अडचणी येऊ शकतात, असंही या ट्विटमध्ये म्हटलंय.

आधारला पॅन कार्डसोबत करा लिंक -

SBIने ट्विट करून ग्राहकांना आधार कार्ड ( Aadhar card) आणि पॅन कार्ड (Pan card link) लिंक करणं अनिवार्य असल्याचं सांगितलंय. जर पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर PAN इनअॅक्टिव्ह (Inactive) होतील आणि ग्राहकांना ट्रॅन्झॅक्शन करण्यात अडचणी येतील. पॅनला आधार कार्डसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख (Last date) 30 जून आहे.

हे वाचा: PAN-Aadhaar घरबसल्या करा लिंक; असं तपासा तुमचं Linking Status

SBI ने काय म्हटलंय?

"आम्ही आमच्या ग्राहकांना पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देतोय, जेणेकरून ग्राहकांना बँक सर्व्हिसमध्ये (Bank service) कोणतीही अडचण येणार नाही." असं SBIने ट्विटमध्ये म्हटलंय

टॅक्स भरणार्‍या नागरिकांना  (Tax payers) येणार्‍या अडचणी (problems) लक्षात घेता   केंद्र सरकारने (Indian Government) आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. ग्राहकांना 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी पहिल्यांदा 2017 मध्ये डेडलाईन (Deadline) दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत सरकारने अनेकदा डेडलाईन वाढवून दिली आहे.

तुम्हीही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले नसेल तर 30 जूनपूर्वी करून घ्या. अन्यथा तुम्हाला पॅन कार्ड वापरण्यासह बँकेचे ट्रॅन्झॅक्शन करण्यात अडचणी येतील.

First published:

Tags: Aadhar card, Pan card, State bank of india