नवी दिल्ली, 26 एप्रिल: देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना भीतीचं वातावरण आहे. या काळात लोक घरीच आहेत त्यामुळे कॅशलेस ट्रांजेक्शन वाढलेले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्याच संदर्भात SBIने ट्विट करत आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. SBI ने ट्विटरवरून लोकांना डिजिटल पेमेंट करताना सावधान रहाण्यास सांगितले आहे. काही अनोळखी लोक फोन कॉलवरून लाईफ सेव्हींग औषधे देण्याची बतावणी करुन पैसे लुटत आहेत. या आधीही SBIने अनोळखी फोन कॉल्सवर अकाऊंट डिटेल्स शेअर न करण्याचं आवाहन केलं होतं.
SBIचं ट्विट
SBIने ट्विटमध्ये सांगितलंय की पैसे ट्रान्सफर करताना नेमके कोणाला पैसे ट्रान्फर करत आहात त्याचं व्हेरिफीकेशन करा. वेगवेगळ्या मार्गांनी फ्रॉड लोक ग्राहकांना चुना लावत आहेत.
आपले
डिटेल्स शेअर करु नका
आपला पिन नंबर, सीव्हीव्ही नंबर, ओटीपी आणि एटीएम नंबर कोणा बरोबरही शेअर करु नका. असं केल्यास आपली फसवणूक होऊ शकते. फसवणूक करणारे लोक आता जीवरक्षक औषधांच्या नावाखाली कॉल करु लागले आहेत. फोनमध्ये हे नंबर कधीही सेव्ह करु नका.
Please ensure to verify the authenticity of the beneficiary you are dealing with before making any payment. pic.twitter.com/ilFFyseglP
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 23, 2021
कार्डचे फोटो सेव्ह करु नका
बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड,एटीएम कार्डचा क्रमांक किंवा त्याचे फोटो सेव्ह करु नका. नाहीतर हे धोकादायक ठरेल आणि आपली माहिती लीक होण्याची शक्यता निर्माण होईल. या चुकीमुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.
(LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी Alert! यामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती)
एटीएम कार्ड शेअर करु नका
एटीएम कार्ड इतर कोणाबरोबरही शेअर करू नका. नाहीतर आपल्या कार्डची माहिती लीक होऊ शकते आणि कोणीही आपल्याला सहजपणे फसवू शकतं.
(Bank Holidays: मे महिन्यात 5 दिवस बँका बंद; कोरोनामुळे बसणार दुहेरी फटका)
पब्लिक इंटरनेटचा वापर टाळा
स्टेट बँकेच्या मते ग्राहकांनी पैशांच्या व्यवहारासाठी सार्वजनिक इंटरनेट वापर करु नये. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती असते.
(मुंबईत अवघ्या 80 रुपयात झाली ब्रॅन्डची सुरुवात; आता Turnover पोहोचला 800 कोटींवर)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, SBI, Sbi account, Sbi alert, Sbi ATM, SBI Bank News