नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : भारतीय स्टेट बँकेला (State Bank of India) पुन्हा एकदा मेटेनन्स ब्रेक (Maintenance Break) घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी (Wednesday) म्हणजेच 15 सप्टेंबरला (15 September) हा ब्रेक घेतला जाणार आहे. जेव्हा जेव्हा बँकेची सेवा मेंटेनन्ससाठी बंद असते, तेव्हा देशातील लाखो ग्राहकांवर त्याचा परिणाम होत असतो. असा परिणाम पुन्हा एकदा ग्राहकांवर होणार असून मेंटेनन्सच्या वेळा लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या बँकिंग व्यवहारांचं नियोजन करावं, अशी विनंती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience.#InternetBanking #OnlineSBI #SBI pic.twitter.com/5SXHK20Dit
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 14, 2021
जाणून घ्या तपशील
बँकेच्या ऑनलाईन प्रणालीत काही बदल करण्यासठी आणि काही त्रुटी दूर करण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी हा मेंटेनन्स ब्रेक घेण्यात येणार आहे. या वेळात बँकेचे सर्व ऑनलाईन व्यवहार बंद असणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाची सेवा बंद असेल. त्यामुळे या 120 मिनिटांच्या कालावधीत कुठलेही व्यवहार पूर्ण होणार नाहीत. ग्राहकांनी हे दोन तास सोडून इतर वेळात आपले व्यवहार करावेत, असं बँकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
यापूर्वीही घेतला होता ब्रेक
यापूर्वी गेल्या महिन्यातही स्टेट बँक ऑफ इंडियानं मेंटेनन्स ब्रेक घेतला होता. 16 जुलै आणि 17 जुलै या दोन दिवशी काही तास बँकेचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात स्टेट बँकेच्या कुठल्याही ग्राहकाला व्यवहार करता आले नव्हते. आता पुन्हा 15 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी मध्यरात्री एसबीआयकडून मेंटेनन्स ब्रेक घेतला जाणार आहे.
हे वाचा - कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश; मुंबईतील मुलीचा तडफडून मृत्यू
एसबीआयनं गेल्या आर्थिक वर्षात 55 टक्के अधिक नफा कमावल्याची नोंद करण्यात आली आहे. एसबीआयच्या निव्वळ नफ्यात यंदा 6.504 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कर्जांची वसुली आणि एनपीएमधील सुधारणांमुळे हे शक्य झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, State bank of india