• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI चा अतिशय कामाचा फोन नंबर; घरबसल्या होतील बहुतेक कामं

SBI चा अतिशय कामाचा फोन नंबर; घरबसल्या होतील बहुतेक कामं

SBI च्या फोन कॉल सेवेसह, तुम्ही तुमच्या घरच्या आरामात अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही 1800-1234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : इंटरनेटने (Internet Service) संपूर्ण जग आपल्या मोबाईल फोनमध्ये व्यापले आहे. अशी सर्व कामे तुम्ही घरी बसून क्षणार्धात करता येतात ज्यासाठी पूर्वी खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता. बँकिंगचे जगही (Banking Service) तुमच्या खिशात उतरले आहे. ऑनलाईन प्रणालीचा (Online System) ग्राहकांना फायदा होत असतानाच बँकांवरील कामाचा ताण देखील कमी झाला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी (SBI Customers) मोबाईलवर अनेक सेवा सुरू केल्या आहेत. आता ग्राहक घरी बसून एकाच फोन कॉलवर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने फोन कॉल सेवेसाठी 1800-1234 हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. काय फायदा होणार? SBI च्या फोन कॉल सेवेसह, तुम्ही तुमच्या घरच्या आरामात अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही 1800-1234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. तुम्ही तुमच्या शेवटच्या 5 व्यवहारांची (Last 5 transactions) माहिती देखील मिळवू शकता. या नंबरवर मेसेज करून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपशील देखील मिळवू शकता. चहा विकून 26 देश फिरणारे आजोबा गेले; 300 रुपयांच्या बचतीवर जग फिरणारं जोडपं टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही एटीएम कार्ड पुन्हा इश्यू करू शकता किंवा तुमचे सध्याचे एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही एटीएमचा पिन क्रमांकही जनरेट करू शकता. एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम कार्डसाठी तुम्ही या क्रमांकाची मदत घेऊ शकता. या सुविधेबाबत एसबीआयचे म्हणणे आहे की या कॉल सेवेमुळे ग्राहकांना कोणाच्याही संपर्कात न येता बँकांचे काम हाताळण्याची सोय होईल. SBI अलर्ट स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे की, ग्राहकांनी फसवणुकीबाबत सतर्क राहावे. एसबीआयने म्हटले आहे की, बँक तपशील, एटीएम किंवा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नका. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ते किंवा त्यांचे कर्मचारी तुम्हाला खाते क्रमांक, डेबिट कार्ड तपशील आणि इंटरनेट बँकिंग संबंधित माहिती विचारत नाहीत. बँक देखील OTP मागत नाही किंवा फोन, एसएमएस किंवा ईमेलद्वारे इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास सांगत नाही. घरमालकाकडे पॅनकार्ड नाही, तरीही HRA मध्ये मिळवू शकता सूट खरंतर गिफ्टच्या नादात लोक बनावट लिंकवर क्लिक करून लोक फसवणुकीचे बळी ठरतात. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देते.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: