मराठी बातम्या /बातम्या /मनी /बातमी तुमच्या फायद्याची : SBI च्या या योजनेतून होईल मोठा फायदा, आज आहे स्कीमचा अखेरचा दिवस

बातमी तुमच्या फायद्याची : SBI च्या या योजनेतून होईल मोठा फायदा, आज आहे स्कीमचा अखेरचा दिवस

SBI बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposits) जास्त व्याज देण्याबरोबरच विना प्रक्रिया शुल्क कर्ज (Loan) उपलब्ध केलं आहे.

SBI बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposits) जास्त व्याज देण्याबरोबरच विना प्रक्रिया शुल्क कर्ज (Loan) उपलब्ध केलं आहे.

SBI बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposits) जास्त व्याज देण्याबरोबरच विना प्रक्रिया शुल्क कर्ज (Loan) उपलब्ध केलं आहे.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्याने, तसंच व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. या संकटामुळे लोकांनी बचतीवर अधिक भर देण्यास सुरुवात केली असून, सुरक्षित गुंतवणुकीला अधिक प्राधान्य दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आणि देशाच्या स्वातंत्र्याला (Platinum Jubilee of the India’s Independence) 75 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्तानं सर्वत्र राबवण्यात येत असलेल्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ (Azadi Ka Amrut Mahotsav) या विशेष अभियानाचं औचित्य साधून, देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातली सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (State Bank of India) SBI ने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी एक विशेष योजना सुरू केली आहे.

    स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत बँकेने मुदत ठेवींवर (Fixed Deposits) जास्त व्याज देण्याबरोबरच विना प्रक्रिया शुल्क कर्ज (Loan) उपलब्ध केलं आहे. त्यामुळे असंख्य ग्राहकांना अधिक लाभ मिळवण्याची संधी मिळाली आहे. आज, 14 सप्टेंबर रोजी या योजनेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्टेट बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेला तात्काळ भेट द्या.

    स्टेट बँकेनं स्वातंत्र्यदिनी ‘एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट’ (SBI Platinum Deposit) नावाची विशेष ठेव योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 0.15 टक्के अधिक व्याजदर मिळेल. 75 दिवस, 525 दिवस म्हणजे 75 आठवडे आणि प्लॅटिनम 2250 दिवस म्हणजे 75 महिने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. स्टेट बँक सध्या ठेवींवर जास्तीत जास्त 5.40 टक्के व्याज देत आहे. त्या तुलनेत या योजनेअंतर्गत अधिक 0.15 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.

    पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना, दर महिन्याला मिळेल 10000 रुपये पेन्शन

    त्याचप्रमाणे स्टेट बँकेने 14 सप्टेंबरपर्यंत गृह (Home), वैयक्तिक (Personal), वाहन (Car) आणि सुवर्ण कर्जावर (Gold Loan) प्रक्रिया शुल्क (Processing Fee) न आकारण्याचा निर्णय घेतला असून कर्जाच्या व्याजदरात विशेष सवलतदेखील देण्यात येत आहे. सुवर्ण कर्जावर अर्धा टक्का (0.50 टक्के) आणि वाहन कर्जावर पाव टक्का (0.25 टक्के) सूट देण्यात येत आहे. वाहन कर्जावर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला योनो अॅपद्वारे (YONO app) अर्ज करण्याची आवश्यकता आहे. आता ग्राहकांना स्टेट बँकेकडून 7.50 टक्के दराने सुवर्ण कर्ज आणि वाहन कर्ज मिळेल. बँकेने कोरोना योद्ध्यांना खास सवलत देऊ केली असून, त्यांना वैयक्तिक कर्जावर अर्धा टक्का (0.50 टक्के) अतिरिक्त सूट दिली जात आहे. या सर्व सवलती 14 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असल्यानं ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आजच बँकेला भेट देणं आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: SBI, Sbi alert