मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, 'या' सेवेसाठी मोजावी लागणार जास्त रक्कम

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, 'या' सेवेसाठी मोजावी लागणार जास्त रक्कम

एसबीआय (SBI) चे लॉकर वापरण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशातील सर्वात मोठ्या बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरक्षित जमा लॉकरचं (Safe Deposit Lockers) शुल्क वाढवलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : एसबीआय (SBI) चे लॉकर वापरण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशातील सर्वात मोठ्या बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरक्षित जमा लॉकरचं (Safe Deposit Lockers) शुल्क वाढवलं आहे. नवीन शुल्क पद्धती 31 मार्चपासून लागू होणार आहे. यानंतर एसबीआयच्या लॉकर्सचं वार्षिक भाडं किमान 500 रुपयांनी वाढेल. SBI च्या छोट्या लॉकरसाठी आकारण्यात येणारं शुल्क 500 ते 2000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तर एक्स्ट्रा लॉकरचं वार्षिक शुल्क 9000 होतं, ते आता 12 हजारपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

बँकेत लॉकर उघडण्याचे नियम

RBI नोटिफिकेशन नुसार तुम्हाला कोणत्याही बँकेत विना खातं लॉकर उघडू शकता. मात्र एखाद्या बँकेत खातं नसल्यास त्या बँकेकडून लॉकर उघडण्यासाठी त्याकरता लागणारं शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिटची कारण देण्यात येतात. काहीवेळी बँकेकडून एफडी (FD) काढण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. अशावेळी ज्या बँकेत बचत खातं आहे, तिथेच लॉकर उघडणं केव्हाही चांगलं.

SBI चे लॉकर महागले

SBI चा मीडियम लॉकर आत 1 हजांरावरून 4 हजारांपर्यंत महागला आहे. तर मोठ्या लॉकरची किंमत 2,000 ते 8,000 रुपये असेल. हे नवीन दर केवळ मेट्रोसिटी आणि शहरी भागात लागू होतील. यामध्ये GST चा समावेश नाही आहे. SBI शाखा छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात स्वस्त दरात ही सेवा पुरवतात. याठिकाणी लॉकर्सच्या किंमती 1500 पासून 9 हजार रुपयांपर्यंत आहेत.

लॉकरचा वापर कसा कराल?

प्रत्येक लॉकरसाठी चावी पुरवण्यात येते. एक चावी ग्राहकाकडे तर दुसरी बँकेकडे असते. दोन्ही चाव्यांचा वापर करूनच लॉकर उघडण्यात येईल. जेव्हा ग्राहकाला लॉकरचा वापर करायचा असेल, तेव्हा त्याची माहिती बँकेला असणं आवश्यक आहे. दुसऱ्या कुणाच्या हातात तुमची चावी गेल्यास तो लॉकर उघडू शकत नाही.

(हेही वाचा- SBI अलर्ट! 500 आणि 2000 च्या नोटांसंदर्भात 'ही' माहिती नसल्यास होऊ शकते फसवणूक)

वर्षभरात तुम्ही किती वेळा लॉकर ऑपरेट करणार याची मर्यादि निश्चित असते. बँकांनुसार यामध्ये वैविध्य आहे. जॉइंट लॉकर उघडणं जास्त फायद्याचं आहे, ज्यामुळे कोणत्याही दोघांना लॉकर वापरणं सोपं होईल

लॉकरमध्ये असणाऱ्या वस्तूचं नुकसान भरपाई मिळते का?

लॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही गोष्टींसाठी बँक जबाबदार नाही. भूकंप, पूरासारखी नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला किंवा चोरी झाल्यास बँक कोणतीच नुकसान भरपाई देत नाही. लॉकरमध्ये असणाऱ्या वस्तूंबाबत बँकेला माहिती नसते. त्यामुळे लॉकरमध्ये असणारी तुमची कोणतीही किंमती वस्तू 100 टक्के सुरक्षित आहेच असं नाही.

First published:

Tags: SBI, Sbi alert