मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI ग्राहकांना मोठा झटका! FD वरील व्याजदर घटवले, तपासा नवे रेट्स

SBI ग्राहकांना मोठा झटका! FD वरील व्याजदर घटवले, तपासा नवे रेट्स

SBI FD Rates: एसबीआयने 2 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर 1-2 वर्षाकरता असणारे  व्याज 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाली आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने 2 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर 1-2 वर्षाकरता असणारे  व्याज 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाली आहेत.

याआधी एसबीआयने 27 मे रोजी एफडीवरील व्याजदर कमी केले होते. आपल्या देशात एफडी एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडीकडे पाहिले जाते.

एसबीआयच्या एफडीवर नवीन दर 10 सप्टेंबरपासून लागू, हे आहेत नवे व्याजदर-

-7 ते 45 दिवस - 2.90 टक्के

-46 ते 179 दिवस - 3.90 टक्के

-180 ते 210 दिवस - 4.40 टक्के

-211 दिवस ते 1 वर्ष - 4.40 टक्के

(हे वाचा-ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?)

-1 ते 2 वर्ष - 4.90 टक्के

-2 ते 3 वर्ष - 5.10 टक्के

-3 ते 5 वर्ष - 5.30 टक्के

-5 ते 10 वर्ष - 5.40 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एफडी दर

-7 ते 45 दिवस - 3.40 टक्के

-46 ते 179 दिवस - 4.40 टक्के

-180 ते 210 दिवस - 4.90 टक्के

-211 दिवस ते 1 वर्ष - 4.90 टक्के

(हे वाचा-ही आहेत 6 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती! मिळेल एफडीपेक्षा जास्त फायदा)

-1 ते 2 वर्ष - 5.40 टक्के

-2 ते 3 वर्ष - 5.60 टक्के

-3 ते 5 वर्ष - 5.80 टक्के

-5 ते 10 वर्ष - 6.20 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी प्रोजेक्ट

त्याचप्रमाणे बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक एफडी प्रोजेक्ट 'एसबीआय वीकेअर डिपॉझिट' लाँच केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर 30 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. एसबीआय वीकेअर योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू आहे.

(हे वाचा-मुलांसाठी ही LIC पॉलिसी खरेदी केल्यास नाही घ्यावं लागणार शैक्षणिक कर्ज)

याआधी एसबीआयने कर्जामधील प्रमुख दर एमसीएलआर- मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR-Marginal Cost of Funds based Lending Rate)  बाबत मोठा निर्णय घेतला होता. एसबीआयने MCLR रिसेट फ्रिक्वेन्सी 1 वर्षावरून कमी करत 6 महिने केली आहे. कर्ज घेणाऱ्यांना घसरणाऱ्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी एक वर्ष थांबण्याची आता गरज नाही. सध्या एसबीआयचा एका वर्षाचा MCLR 7 टक्के तर 6 महिन्याचा 6.95 टक्के आहे.

First published:
top videos

    Tags: SBI