Home /News /money /

'Work From Anywhere'ची सुविधा देणार ही कंपनी, कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाचा निर्णय

'Work From Anywhere'ची सुविधा देणार ही कंपनी, कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाचा निर्णय

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कुठूनही काम (Work From Anywhere) करण्याची सुविधा सुरू करणार आहे

    नवी दिल्ली, 15 जुलै : देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कुठूनही काम (Work From Anywhere) करण्याची सुविधा सुरू करणार आहे. कोव्हिड 19 च्या संकटकाळामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणापासून वाचवता येईल. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी बँकेच्या 65व्या एजीएममध्ये असे सांगितले की, याकरता बँकेचा पाया मजबूत ठेवणे गरजेचे आहे. या निर्णयातून बँकेचा 1000 कोटींचा खर्च देखील वाचण्याची अपेक्षा आहे. रजनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयचे पूर्ण लक्ष कंपनीचा खर्च कमी करणे (Cost Cutting), कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि त्यांना Administration ऑफिसमधून सेल्स ऑफिसमध्ये तैनात करणे यावर असेल. बँक 'कुठूनही काम' या सुविधेची मूलभूत रचना विकसीत करणार आहे. (हे वाचा-जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी) त्यांनी असे आश्वासन दिले की यामध्ये कर्मचाऱ्यांचे सामाजिक आणि कामकाजाचे जीवनाचे संतूलन राखले जाईल. यामुळे बँकेचे 1000 कोटी रुपये वाचण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कोव्हिड 19 च्या संकटकाळात ही बचत महत्त्वाची ठरेल. SBI चे चेअरमन पुढे असं म्हणाले की, यावर्षी कोरोनाचे संकट आहे. परिणामी 2020-21 मध्ये इतर बँका आणि कोणत्याही आर्थिक संस्थांप्रमाणे एसबीआयसाठी देखील हे वर्ष खडतर असणार आहे. मात्र या संकटाशी सामना करण्यासाठी एसबीआय पूर्णपणे तयार असल्याचे ते म्हणाले. एसबीआयने लागू केलेल्या सर्व योजनांसदर्भात आवश्यक काळजी देखील घेतली जात असल्याचे रजनीश कुमार म्हणाले. कमीत कमी काळात बँक या संकटातून बाहेर पडेल असा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला. (हे वाचा-बहिण-भावाच्या नात्यामुळे बसणार चीनला फटका, 4000 कोटींचे होणार नुकसान) रजनीश कुमार यांनी अशी माहिती दिली की, बँक त्यांच्या ग्राहकांची मदत करण्यासाठी अॅसेट्स क्वालिटी ठेवून सक्रियतेने पावलं उचलत आहे. त्याचप्रमाणे बँकेचे मोबाइल App एसबीआय YONO वर देखील विशेष भर देण्याबाबत त्यांनी भाष्य केले. पुढील महिन्यापर्यंत योनो युजर्सची संख्या दुप्पट करण्याचा बँकेचा मानस आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, SBI

    पुढील बातम्या