Elec-widget

मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का

मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताच्या GDP वाढीचा दर 4.2 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीमध्ये भारताच्या GDP वाढीचा दर 4.2 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

SBI ने म्हटलं आहे की, ऑटोमोबाईल विक्रीमध्ये घट, एअर ट्रॅफिक मूव्हमेंटचं प्रमाण कमी, कोअर सेक्टरची वाढीतली घट आणि बांधकाम आणि संरचना क्षेत्रात घटलेली गुंतवणूक यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात घट झालीय.जूनच्या तिमाहीमध्ये भारताची GDP वाढ आधीच नीचांक गाठला होता. हा दर 5 टक्क्यांवर आला.

सप्टेंबरमध्ये IIP ला धक्का

उत्पादन क्षेत्र, विद्युतनिर्मिती या क्षेत्रातल्या मंदीमुळे सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाला मोठा धक्का बसला.

2021 च्या आर्थिक वर्षात तेजी

Loading...

असं जरी असलं तरी 2021 मध्ये आर्थिक वाढीमध्ये तेजी येईल, असं सांगण्यात येतंय. आर्थिक वाढीचा दर 6.2 टक्के होऊ शकतो.

वीजनिर्मितीची आकडेवारी पाहिली तर सप्टेंबरमध्ये यात 2.6 टक्के घट झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वीजनिर्मितीमध्ये 8.2 टक्क्यांची वाढ झाली. खाण उत्पादनात 8.5 टक्क्यांची मोठी घट झाली.

(हेही वाचा : खूशखबर! कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर)

=============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Nov 12, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...