तुमचं SBI मध्ये खातं आहे का? तुम्हाला मिळणार या नव्या सुविधा

तुमचं SBI मध्ये खातं आहे का? तुम्हाला मिळणार या नव्या सुविधा

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेली SBI ने आपल्या ग्राहकांना आणखी काही सुविधा दिल्या आहेत. SBI Quick नावाची ही हेल्पलाइन आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : देशातली सगळ्यात मोठी बँक असलेली SBI ने आपल्या ग्राहकांना आणखी काही सुविधा दिल्या आहेत. SBI Quick नावाची ही हेल्पलाइन आहे. SMS किंवा एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. या सुविधेमुळे तुम्ही अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, चेक बुकसाठी अर्ज, मागच्या 6 महिन्यांतला अकाउंट बॅलन्स, होम लोन आणि एज्युकेशन लोन, इंटरेस्ट सर्टिफिकेट याबद्दलची माहिती मिळवू शकता. यामध्ये SBI ने सुट्यांच्या कॅलेंडरसारख्या आणखी काही सोयी जोडल्या आहेत.

सुट्यांची यादी

या नव्या फीचर्सच्या मदतीने ग्राहक आपल्या राज्यांतल्या बँकेच्या सुट्यांच्या यादीबदद्ल (Bank Holiday List) माहिती मिळवू शकता. यामध्ये सगळी राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सर्कलच्या आधारे सुट्यांची यादी असेल. आर्थिक मंदी सोसत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेनुसार घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना जर ठरलेल्या वेळेत घराचं पझेशन मिळालं नाही तर बँक ग्राहकांना पूर्ण रक्कम परत देईल. जोपर्यंत बिल्डरचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ही रिफंड योजना मान्य असेल.

(हेही वाचा : पोस्टात खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पैसे काढताना द्यावा लागणार कर)

या लोकांना होणार फायदा

या योजनेत जास्तीत जास्त अडीच कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी गृहकर्ज मिळू शकतं. यामध्ये बँकेच्या अटी पाळणाऱ्या बिल्डरांना 50 कोटी रुपयांपासून ते 400 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल. SBI चे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा घर खरेदी करणाऱ्यांना लाभ मिळेल. ज्यांना घराचं पझेशन लवकर न मिळाल्याने आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ही फायदेशीर योजना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Jan 12, 2020 08:17 AM IST

ताज्या बातम्या