Elec-widget

SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे

SBI च्या ग्राहकांना ATM सेंटरमध्ये जाण्याची नाही गरज, इथून काढू शकता पैसे

ही सेवा भारतीय स्टेट बँक, प्रीपेड कार्ड होल्डर्ससाठी SBI पॉइंट ऑफ सेल टर्मिनलवर उपलब्ध असेल. यामध्ये दिवसाला कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये काढता येतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आता तुम्हाला छोट्याछोट्या कारणांसाठी पैसे हवे असतील तर ATM सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. पैसे हवे असतील तर जवळच्या किराणा स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही पैसे घेऊ शकता. ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे.

ही सेवा भारतीय स्टेट बँक, प्रीपेड कार्ड होल्डर्ससाठी SBI पॉइंट ऑफ सेल टर्मिनलवर उपलब्ध असेल. यामध्ये दिवसाला कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये काढता येतील.

या व्यवहारासाठी 1 टक्के रक्कम द्यावी लागेल. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार ही रक्कम कमीत कमी साडेसात रुपये आणि जास्तीत जास्त 10 रुपये असेल. यामुळे किराणा दुकानदाराला रोज बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची गरज नाही. त्याच्या वेळेचीही बचत होईल.

(हेही वाचा : लग्नसराईच्या दिवसांत सोनं -चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर)

समितीने केली शिफारस

Loading...

याची अधिक माहिती घ्यायची असेल तर SBI च्या अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल. ATM सेंटर्सची संख्या घटल्यामुळे यावर उपाय काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली होती. या समितीने निमशहरी भागातल्या दुकानदारांच्या माध्यमातून कॅशचा पुरवठा करण्याची शिफारस केली होती. वाढत्या खर्चामुळे बँका ATM सेंटर्स बंद करतायत, असं समितीचं म्हणणं होतं. या परिस्थितीत किराणा स्टोअर्समधून पैसे काढण्याचा उपाय सुचवण्यात आला होता.

================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...