मुंबई, 12 ऑगस्ट: तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही जर एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएममधून रोख रक्कम (ATM Transactions Limit) काढण्याची मर्यादा प्रत्येक बँकेची वेगवेगळी असते. जाणून घ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI atm), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank) महत्त्वाच्या बँकांचे एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत. जाणून घ्या कोणत्या बँकेच्या एटीएममधून एका दिवसात किती पैसे काढला येतील?
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India ATM)
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयच्या एटीएममधून तुम्ही एका दिवसात कमीत कमी 100 रुपये तर जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या खातेधारकांना 18 प्रकारचे एटीएम कार्ड प्रदान करते. ग्राहकांची ट्रान्झॅक्शन्स सोपी आणि सहज व्हावी याकरता बँके अशाप्रकारे 18 एटीएम कार्ड प्रदान करते आहे. सामान्य SBI ATM कार्डपासून ते फॉरेन करन्सी डेबिट कार्डपर्यंत देखील कार्ड उपलब्ध आहेत.
हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात जबरदस्त घसरण! सोनं रेकॉर्ड हायपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank ATM)
पीएनबीबाबत बोलायचे झाले तर बँकेच्या प्लॅटिनम आणि Rupay डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एका दिवसात 50000 रुपयांचं ट्रान्झॅक्शन करू शकता. तर मास्टर डेबिट कार्ड किंवा क्लासिक रुपे कार्डचा वापर करत असाल तर तुम्ही एका दिवसात 25 हजार रुपये काढू शकता.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank ATM)
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, तुम्ही प्लॅटिनम चीप कार्डच्या माध्यमातून दररोज 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. तर Visa सिग्नेचर डेबिट कार्डच्या माध्यमातून 1.5 लाख रुपये काढता येतील
हे वाचा-सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँक प्लॅटिनम कार्डाच्या माध्यमातून 1 लाख रुपये दररोज काढता येतील.
बँकांना द्यावा लागेल दंड
एटीएममध्ये पैसे नसल्यास (non-availability of cash in ATMs) ग्राहकांचा खोळंबा होतो. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) यासंदर्भांत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आता बँकेला दंड भरावा लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हा महत्त्वाचा निर्णय लागू होत आहे. . महिनाभरामध्ये एकूण 10 तासांपेक्षा जास्त काळासाठी एटीएममध्ये कॅश नसल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Bank, Bank details, Bank services, Hdfc bank, Icici bank, Pnb, Sbi ATM, State bank of india