मराठी बातम्या /बातम्या /मनी /'... तर तुमचं बँक खाते होईल रिकामं'; SBI, PNB आणि ICICI बँकांचा ग्राहकांना इशारा

'... तर तुमचं बँक खाते होईल रिकामं'; SBI, PNB आणि ICICI बँकांचा ग्राहकांना इशारा

State Bank Of India कस्टमर कॉनटॅक्टलेस सर्वीस

State Bank Of India कस्टमर कॉनटॅक्टलेस सर्वीस

ऑनलाइन फसवणूकीची प्रकरणेही सातत्यानं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही बँकांनी ट्विटद्वारे लोकांना याबद्दल जागरूक केलं आहे.

    नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँक (SBI),पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI) या तिन्ही बँकांनी आपल्या सर्व ग्राहकांना सतर्कतेचा इशारा (Alert) दिला आहे. ऑनलाइन फसवणूकीचे (Online Fraud) वाढते प्रकार लक्षात घेऊन या बँका आपल्या ग्राहकांना सतर्क करत आहेत. सध्या देशात डिजिटल पेमेंटचे (Digital Payment) प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणूकीची प्रकरणेही सातत्यानं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही बँकांनी ट्विटद्वारे लोकांना याबद्दल जागरूक केलं आहे.

    भारतीय स्टेट बँक :

    तुमचे स्टेट बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेने ग्राहकांसाठी एक सावधगिरीचा इशारा (Alert) जारी केलाअसून, बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे की, तुम्हाला इतर कोणत्याही मार्गानं कोणताही क्यूआर कोड मिळाला तरतो चुकूनही स्कॅन करू नका. असा क्यूआर कोड स्कॅन केल्यास आपल्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. आपण क्यूआर कोड स्कॅन करता तेव्हा आपल्याला पैसे मिळत नाहीत,असंही स्टेट बँकेनं ट्विटमध्ये नमूद केलं आहे. जेव्हा तुम्ही क्यूआर कोड (QR code) स्कॅन करता तेव्हा केवळ एक संदेश येतो की आपल्या बँक खात्यातून अमुक एवढी रक्कम वजा झाली आहे. त्यामुळं जोपर्यंत कोणालाही पैसे द्यायचे नाहीत तोपर्यंत कोणीही पाठवलेले क्यूआरकोड स्कॅन करु नका अशी सूचना बँकेनं दिली आहे.

    तसंच ग्राहकांनी त्यांचे एटीएम कार्ड (ATM card) इतर कोणाबरोबरही शेअर करू नये असं केल्यास आपल्या कार्डची माहिती गैर व्यक्तींच्या हाती पडू शकते आणि कोणीही आपल्याबरोबर सहजपणे फसवणूक करू शकते. बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक यांचे फोटो काढून ठेवणंही धोकादायक ठरू शकते. यामुळं आपलं खातं देखील पूर्णपणे रिकामे होऊ शकते असंही बँकेनं म्हटलं आहे.

    LPG Gas Cylinder: केवळ 9 रुपयांत गॅस सिलेंडर बुक करण्याची शेवटची संधी, असं करा पेमेंट

    पंजाब नॅशनल बँक:

    पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा देताना फिशिंग घोटाळ्यापासून सावध राहाण्याची सूचना केली आहे. पंजाब नॅशनल बँकेनंआपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या धोक्यांबाबत सावध राहण्याची सूचना केली आहे. एका लहानशा चुकीमुळे तुमचे सगळे बँक खातं रिकामं होऊ शकतं,असं बँकेनं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या फसवणूकी पासून वाचण्यासाठी बँकेनं काही उपायही सांगितले आहेत.

    फसवणूकटाळण्यासाठीचे उपाय :

    ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, यूपीआय पिन शेअरकरू नका. बँकिंग संदर्भातील आपली माहिती कधीही फोनमध्ये सेव्ह करु नका. एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका. ऑनलाइन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा. माहिती घेतल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका. अनोळखी लिंक असेल तर त्याची खात्री केल्याशिवाय उघडू नका. स्पायवेअरपासून सांभाळून रहा. बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.

    आयसीआयसीआय बँक:

    बँक कधीही आपली वैयक्तिक माहिती विचारत नाही, असं ट्विटकरून आयसीआयसीआय बँकेनं (ICICI Bank) ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. फोन आणि एसएमएसद्वारे सीव्हीव्ही पिन, ओटीपी, पिन, पासवर्ड यासारखी माहिती विचारली जात असेल तर ती चुकूनही शेअर करू नका अशी सूचना बँकेनं केली आहे.

    First published:

    Tags: Icici bank, Pnb bank, SBI