नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सोमवारी अशी माहिती दिली की, यावर्षी एसबीआयमध्ये 14000 नोकरभरती होणार आहे. याआधी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना अर्थात व्हीआरएस आणण्याची देखील घोषणा केली होती. मीडिया अहवालानुसार कॉस्ट कटिंगसाठी एसबीआय व्हीआरएसची योजना घेऊन येत आहे. यावर एसबीआयने असे म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या ऑपरेशन्सच्या सीमा वाढवायच्या आहेत आणि त्याकरता मनुष्यबळाची गरज आहे. याचमुळे 14 हजार नवीन लोकांची भरती केली जाणार आहे.
एसबीआयने सोमवारी जारी केलेल्या एका स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, 'आमचे सध्याचे वर्कफोर्स 2.50 लाख कर्मचाऱ्यांचे आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमी पुढे आलो आहोत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबद्ध आहोत. आम्ही देशातील तरुणांच्या स्किलिंग प्रक्रियेत भागीदार होऊ इच्छितो. आम्ही देशातील एकमेव बँक आहोत जी भारत सरकारच्या नॅशनल अपरेंटिसशीप स्कीममधील तरुणांना काम देत आहोत.
There've been reports about 'On Tap VRS' scheme proposed to be introduced by SBI. It's been interpreted as cost-cutting measure. SBI is employee-friendly & expanding its operations evidenced by the fact that Bank has plans of recruiting over 14,000 employees this year: SBI Spox pic.twitter.com/0Q01YnkEon
— ANI (@ANI) September 7, 2020
एसबीआयमध्ये एकूण 2.49 लाख कर्मचारी कार्यरत
एकूण 11,565 अधिकारी आि 18,625 स्टाफ एसबीआय व्हीआरस स्कीमसाठी अर्ज करू शकतील. एसबीआयचा असा अंदाज आहे की, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 30 टक्के कर्मचाऱ्यांनी जरी व्हीआरएससाठी अर्ज केला तरी जवळपास 2,170.85 कोटी वाचण्यास मदत होईल. मार्च 2020 पर्यंत एसबीआयमध्ये 2.49 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. याआधी ही संख्या 2.57 लाख होती.
(हे वाचा-ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांच्या पतीला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक)
दरम्यान याआधी 5 असोसिएट बँकाच्या विलिनीकरणाआधी 2017 मध्ये या बँकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएसची घोषणा केली होती. 2001 मध्ये एसबीआयने व्हीआरएसची घोषणा केली होती. पीटीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार व्हीआरएस साठी एक ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप त्याकरता बोर्डाची मंजूरी मिळणे बाकी आहे.
(हे वाचा-अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तातडीने ही पाऊलं उचला; रघुराम राजन यांचा मोठा सल्ला)
या स्कीमअंतर्गत घोषणा केल्या जाणाऱ्या कट ऑफ डेटपर्यंत 25 वर्षांची सर्व्हिस पूर्ण करणाऱ्या किंवा ज्यांचे वय 55 वर्षे आहे ते या योजनेअंतर्गत निवृत्ती घेऊ शकतात. एसबीआय ही योजना 1 डिसेंबर 2020 रोजी इश्यू करेल आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत ही योजना सुरू राहील. या काळात VRS साठी अर्ज मंजुर केले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI