SBI चा अलर्ट, 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करा हा फॉर्म

देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने पेन्शनधारकांसाठी एक इशारा दिला आहे. तुम्ही जर निवृत्त झाला असाल आणि तुमची पेन्शन SBI च्या खात्यात येत असेल तर तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला जमा करणं गरजेचं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 07:30 PM IST

SBI चा अलर्ट, 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करा हा फॉर्म

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने पेन्शनधारकांसाठी एक इशारा दिला आहे. तुम्ही जर निवृत्त झाला असाल आणि तुमची पेन्शन SBI च्या खात्यात येत असेल तर तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला जमा करणं गरजेचं आहे.

सगळ्या पेन्शनधारकांनी त्यांचं लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करायचं आहे. जो खातेदार हे करणार नाही त्याची पेन्शन ॉ रोखली जाऊ शकते. देशभरात सगळ्यात जास्त खाती SBI मध्ये आहेत. बँकेच्या वेबसाइटच्या मते, त्यांच्याकडे 36 लाख पेन्शन खाती आहेत आणि 14 सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेल आहेत.

(हेही वाचा : इथे 5 टोमॅटोंची खरेदी करण्यासाठी मोजावे लागतात 50 लाख!)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही ब्रँचमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सरकारी अॅप उमंग च्या माध्यमातूनही तुम्ही हे सर्टिफिकेट घरबसल्या जमा करू शकता. याआधी, नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शनर बँकेत जाऊन तिथल्या रजिस्टरमध्ये सही करून हयातीचा दाखला द्यायचे पण हे सगळ्यांनाच शक्य नाही. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या शाखेत अधिकृत व्यक्तीला पाठवूनही हयात असल्याचं प्रमाणपत्र सादर करता येतं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या खातेधारकांनी हयातीचं प्रमाणपत्र दिलं नाही तर पेन्शन मिळण्यात अडचणी येतील.

=====================================================================================

Loading...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Nov 2, 2019 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...