या क्रमांकावर मिस्‍डकॉल देऊन मिळवा 14 लाखांपर्यंत कर्ज, वाचा काय आहे SBI ची योजना

या क्रमांकावर मिस्‍डकॉल देऊन मिळवा 14 लाखांपर्यंत कर्ज, वाचा काय आहे SBI ची योजना

SBI Pension Loan:स्टेट बँक ऑफ इंडियाने वरिष्ठ नागरिकांसाठी ही खास कर्ज योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 14 लाखांपर्यंत कर्ज घेता येईल. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एसबीआयने ही योजना बनवली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी: ग्राहकांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागता कामा नये याकरता देशातील सर्वात मोठी बँक असणारी SBI (State Bank of India) दरवेळी नव्या योजना राबवत असते. अगदी वृद्धापकाळासाठी देखील बँकेने काही योजना सुरू केल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास स्कीमची आणली आहे. ज्येष्ठ नागरिक बँकेकडून 14 लाखांचे कर्ज घेऊ शकतात.  एसबीआय ने पेंशन लोन ही योजना खास निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी तयार केली आहे.

एसबीआय ने आपल्या एका ट्वीटमध्ये सांगितले आहे की 9.75 टक्के दराने पेंशन लोन मिळवा आणि एक आनंददायी निवृत्ती अनुभवा.  यासंबंधातील अधिक माहितीसाठी 7208933145 वर एसएमएस करा.  सेवानिवृत्तीनंतर लोकांना पेन्शन मिळते, जे त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी पुरेसे असू शकते, परंतु मोठ्या गरजा भागविण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसते. अशा परिस्थितीत एसबीआय पेन्शन कर्ज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

(हे वाचा-अमेरिकेने भारताकडूनही घेतलंय 15 लाख कोटींचं कर्ज)

या योजनेसाठी कुणाला करता येईल अर्ज?

एसबीआय पेन्शन कर्ज योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक अर्ज करू शकतात. यासाठी पेन्शनरचे वय 76 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयकडे असले पाहिजे. पेन्शनरला असे वचन द्यावे लागेल की,  कर्जाच्या कालावधीत ट्रेझरीला दिलेल्या Mandate मध्ये बदल करणार नाही. त्याअंतर्गत सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी, तटरक्षक दल, राष्ट्रीय रायफल्स आणि आसाम रायफल्ससह सशस्त्र दलाचे निवृत्तीवेतक अर्ज करू शकतात. यातही पेन्शन पेमेंट ऑर्डर फक्त एसबीआयकडेच असावी. यामध्ये किमान वयोमर्यादा नाही. कौंटुबिक निवृत्तीवेतन धारकांचे जास्तीत जास्त वय 76 वर्षे आहे. कौटुंबिक पेन्शनमध्ये पेन्शनधारकांच्या निधनानंतर कुटुंबातील अधिकृत सदस्य निवृत्तीवेतनासाठी अर्ज करू शकतात.

(हे वाचा-नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक)

कर्ज मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

जर एखादा इच्छुक वरिष्ठ नागरिक पेन्शन लोन घेऊ इच्छित असेल, तर त्यांना एक नंबर डायल करून, मिस्ड कॉल किंवा मेसेज करून अर्ज करता येईल. 180089-2211 डायल करा अथवा 7208933145  वर मिस्ड कॉल किंवा एसएमएस "PERSONAL" करून ही प्रक्रिया करता येईल. यानंतर बँकेकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

ही कागदपत्र आवश्यक

-ओळखपत्रासाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड यापैकी एक

-वास्तव्याच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड, बँक अकाउंट स्‍टेटमेंट, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, वीजबिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी पर्चेस अॅग्रीमेंट किंवा आधार कार्ड

-इनकम प्रूफसाठी पेंशन पेमेंट ऑर्डर

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 28, 2021, 10:14 AM IST

ताज्या बातम्या