SBI देतेय सोन्यावर 'ही' ऑफर, ग्राहकांना होणार फायदा

SBI देतेय सोन्यावर 'ही' ऑफर, ग्राहकांना होणार फायदा

1998पासून बँक गोल्ड बँकिंग व्यवसायात कार्यरत आहे. यात मेटल गोल्ड लोन, देशात आणि परदेशात सोन्याची विक्री यांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : देशाची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक SBI ग्राहकांना अनेक सुविधा देत असते. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानं (RBI) भारतात सोनं खरेदी करायला आणि ग्राहकांना विकण्यासाठी SBIनं अधिकृत केलंय.SBI जगातल्या प्रतिष्ठित बँकांमधून सोनं खरेदी करते आणि सोन्याला भारतात सराफांना विकते. SBI सोनं खरेदी करण्यासाठी गोल्ड लोनही देतं. SBIच्या मेटल गोल्ड लोनचा व्याजदर फक्त 2.7 टक्के ते 4.5 टक्क्यांमध्ये आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी, वाचा.. काय आहे कारण

1998पासून SBI गोल्ड बँकिंग व्यवसाय करतेय

1998पासून बँक गोल्ड बँकिंग व्यवसायात कार्यरत आहे. यात मेटल गोल्ड लोन, देशात आणि परदेशात सोन्याची विक्री यांचा समावेश आहे. या योजनेनुसार बँक दागिने बनवण्यासाठी भांडवल देते. दागिने बनवण्यासाठी बँकेकडून सोनं खरेदी केलं जातं. दागिन्यांना देशात किंवा परदेशात विकलं जातं.

JEE Main results 2019 : निकालासोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर, 'अशी' बनते मेरिट लिस्ट

या कर्जासाठी दिली जाते गॅरंटी

SBI चांगल्या दरानं मेटल गोल्ड लोन देते. हे कर्ज ग्राहकांच्या उधारी लिमिटअनुसार ठरवलं जातं. एखाद्या ग्राहकाकडे दुसऱ्या बँकेची गॅरंटी आहे, तर त्या बदल्यात मेटल गोल्ड घेतलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी 22741395 वर फोन करा किंवा dgm.preciousmetals@sbi.co.in वर ईमेल पाठवा.

केरळमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो व्हायरल

देशाची सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. बँकेनं नुकतीच स्पेशल ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केलीय. यात वयानं 70 वर्षाहून मोठे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा आहे. यात कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा आहेत. RBI नं जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झालीय.

यात 6 सुविधा आहेत. यात कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप यांचा समावेश आहे.


हिममानव नेमका कसा असतो? हा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या