SBI चा दिवाळी धमाका! डेबिट कार्डवर मिळणार EMI ची सुविधा

SBI चं ATM किंवा डेबिट कार्ड असणाऱ्यांना खरेदीसाठी दुकानातच थेट कर्ज मिळू शकेल. व्यवहार पूर्ण झाल्यावर एका महिन्याने EMI सुरू होईल. कसा मिळवायचा या सुविधेचा फायदा?

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 03:07 PM IST

SBI चा दिवाळी धमाका! डेबिट कार्डवर मिळणार EMI ची सुविधा

मुंबई, 7 ऑक्टोबर : देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने  (SBI) सणासुदीच्या खरेदीसाठी (Festive Season) त्यांच्या डेबिट कार्डवर  (Debit Card EMI)एक नवी ऑफर जाहीर केली आहे.  सध्याच्या ग्राहकांसाठी ‘डेबिट कार्ड ईएमआय सुविधा’ जाहीर केली आहे. या सुविधेनुसार, डेबिट कार्डवर (EMI) ची सुविधा मिळणार आहे. या नवीन ऑफरमध्ये ग्राहकांना 6 ते 8 महिने कालावधीसाठी ईएमआय उपलब्ध होऊ शकतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर एका महिन्याने ईएमआय सुरू होईल.

स्टेट बँकेच्या या नव्या सुविधेमध्ये 1500 हून अधिक शहरांमधील 40000 हून अधिक व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी EMI पर्याय मिळू शकतो. पाइन लॅब ब्रँडेड पीओएस मशीन असणाऱ्या एकूण साडेचार लाखांहूनअधिक व्यापाऱ्यांकडे   खरेदी करताना ही सुविधा वापरता येईल.

वाचा - सोन्याच्या दागिन्यांबद्दल सरकारचा मोठा निर्णय, खरेदी करण्यापूर्वी वाचा नियम

याविषयी बोलताना, एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितलं, “आमच्या ग्राहकांसाठी हे उत्पादन दाखल करताना आम्हाला आनंद होत आहे. या सणासुदीमध्ये खरेदीचा आनंद द्विगुणित करता येईल. डेबिट कार्ड ईएमआयमुळे ग्राहकांना भारतभरातील विविध मर्चंट स्टोअर्समध्ये ईएमआयवर खरेदी करता येईल. त्यांना तातडीने पैसे द्यावे लागणार नाहीत. ग्राहकांची सोय व समाधान यासाठी एसबीआय सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, हे नवे उत्पादन दाखल करणे म्हणजे बँकेने ग्राहकांना विनासायास खरेदी व पेपरलेस कर्जं करण्यासाठी दिलेली सेवा आहे.”

वाचा - प्लास्टिक बंदीचा असाही परिणाम! पाहा ट्रेनमध्ये तुम्हाला कसं मिळणार पाणी

Loading...

ही सुविधा वापरण्यासाठी कुठल्याही वेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. प्रक्रिया शुल्क नाही. शिवाय तातडीने कर्जाचं वितरण व निवडक ब्रँडवर झीरो कॉस्ट ईएमआय असे पर्याय आहेत. बचत खात्यामध्ये कितीही रक्कम असली तरी काही मिनिटांमध्ये या सुविधेचा लाभ घेणं शक्य आहे. व्यवहार पूर्ण झाल्यावर एका महिन्याने ईएमआय सुरू होईल.

तुम्हाला हा फायदा मिळेल का कसं तपासाल?

उत्तम आर्थिक व क्रेडिट हिस्ट्री असणारे सर्व ग्राहक या कर्जांसाठी पात्र असतील. अशा ग्राहकांशी बँक एसएमएस व ईमेल याद्वारे नियमित संवाद साधेल.

वाचा - नेहरुंनी 68 वर्षांपूर्वी लावलं होतं झाड, आता त्याच 'आरे'तील झाडांवर कुऱ्हाड

पात्रता तपासून घेण्यासाठी, ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावरून DCEMI असा मेसेज 567676 येथे पाठवावा.

हे आहेत फायदे

  • मिनिटापेक्षा कमी कालावधीत कन्झ्युमर ड्युरेबल्ससाठी कर्जे
  • भारतातील 4.5 लाखांहून अधिक पीओएसमध्ये ही सुविधा उपलब्ध
  • 1500 शहरांत 40000 स्टोअरच्या जाळ्यामध्ये EMI सुविधा मिळवणे शक्य
  • प्रक्रिया शुल्क नाही, झीरो डॉक्युमेंटेशन, 6 ते 18 महिने ईएमआयचा पर्याय

हेही वाचा :

हे आहेत जगातील सर्वात धोकादायक देश! इथे जायची हिंमत तुम्ही दाखवाल का...

…म्हणून सोन्या आणि हिऱ्यापेक्षा जास्त आहे व्हेल माशाच्या उलटीची किंमत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...