Home /News /money /

SBI Offer: शॉपिंग करणाऱ्यांसाठी SBI ची धमाकेदार ऑफर; YONO अॅपवरुन ऑर्डर केल्यास मिळणार 70 टक्क्यांपर्यंत सूट

SBI Offer: शॉपिंग करणाऱ्यांसाठी SBI ची धमाकेदार ऑफर; YONO अॅपवरुन ऑर्डर केल्यास मिळणार 70 टक्क्यांपर्यंत सूट

SBI त्यांच्या YONO अॅपद्वारे ग्राहकांना वेळोवेळी अनेक ऑफर देते. YONO वर कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना व्याजदर माफ केले जातात, तर प्री अप्रुव्ह कर्जाची सुविधा देखील आहे.

    मुंबई, 18 एप्रिल : अनेक ऑनलाईन शॉपिंग अॅप्सवर (Online Shopping Apps) सध्या समर सेल सुरु आहे किंवा सुरु होणार आहे. जर तुम्हालाही कपड्यांची खरेदी करायची असेल, तर तुमची आवडती बँक SBI ने धमाकेदार ऑफर (SBI Offer) आणली आहे. तुम्ही SBI च्या बँकिंग अॅप YONO द्वारे ऑर्डर केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. SBI ने आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले की, तुम्हाला टॉप फॅशन ब्रँड्सवर अनेक डिस्काउंट डील मिळतील. तुम्ही YONO अॅपद्वारे ऑर्डर केल्यास तुम्हाला ब्रँडनुसार मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. यावर ग्राहकांना कमाल 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. बँकेने ट्वीटमध्ये सांगितले आहे की एसबीआय आता ग्राहकांना बँकिंग आणि लाईफस्टाईल मजा दोन्ही देईल. ऑपरचा लाभ कसा घेता येईल? ग्राहकाला प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याचे YONO अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे अॅप गुगल प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करू शकता. यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरद्वारे नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला अॅपमधूनच Titan, Lifestyle, Trends, Azio, Biba सारख्या ब्रँडमधून खरेदी करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला Trends वर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. Bank Time: आजपासून बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल, ग्राहकांना होईल फायदा आपल्या ट्वीटमध्ये, SBI ने लिहिले आहे की, जे ग्राहक YONO अॅपद्वारे वेगवेगळ्या ब्रँडसाठी खरेदी करतात त्यांना अॅपवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलतींसह स्वतंत्रपणे बचत करण्याची संधी दिली जाईल. जे ग्राहक SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे अॅपवर खरेदीसाठी पैसे देतात त्यांना स्वतंत्र सूट आणि रिवॉर्ड्स देखील दिली जातील. बँकेच्या या ऑफरचा थेट करोडो ग्राहकांना फायदा होऊ शकतो. रिटायरमेंटनंतर दर महिना मिळेल 22000 रुपये पेन्शन, काय आहे सरकारी योजना YONO वर विविध प्रकारच्या ऑफर उपलब्ध SBI त्यांच्या YONO अॅपद्वारे ग्राहकांना वेळोवेळी अनेक ऑफर देते. YONO वर कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना व्याजदर माफ केले जातात, तर प्री अप्रुव्ह कर्जाची सुविधा देखील आहे. अलीकडेच, SBI ने YONO अॅपद्वारे डिमॅट खाते उघडणाऱ्या व्यक्तीला शुल्क भरण्यापासून सूट दिली होती. SBI ने आता हे अॅप बँकिंग सेवेच्या पलीकडे जाऊन खरेदीच्या सोयीसाठी उघडले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Online shopping, SBI, State bank of india

    पुढील बातम्या