Home /News /money /

SBI कडून बँक नियमात बदल; खातेधारकांना कसा होईल फायदा?

SBI कडून बँक नियमात बदल; खातेधारकांना कसा होईल फायदा?

SBI च्या म्हणण्यानुसार, IMPS द्वारे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली.

    मुंबई, 7 डिसेंबर : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक (Public Sector Bank) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने घेतलेल्या निर्णयांमुळे बँकेच्या लाखो खातेधारकांना (SBI account holders) फायदा आणि तोटा दोन्ही होणार आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS फंड ट्रान्सफरवर बँकेकडून शुल्क आकारलं जाणार नाही. तर यापेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण करण्यासाठी सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. इथे तुम्हाला एका बाजूला फायदा होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तोटा होणार आहे. आता किती शुल्क लागेल? SBI च्या म्हणण्यानुसार, IMPS द्वारे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + GST ​​चार्ज लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाखांवरून 5 लाख रुपये केली. रिझव्‍‌र्ह बँकेने IMPS द्वारे व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. आता 2 लाखांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. Budget 2022 : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा IMPS म्हणजे काय माहित आहे? IMPS म्हणजेच Immediate Payment Service ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे फंड ट्रान्सफर 24X7 केले जाऊ शकते. इंटरनेट बँकिंग व्यतिरिक्त, फंड ट्रान्सफर मोबाइल बँकिंग अॅप्स, बँक शाखा, एटीएम, एसएमएस आणि IVRS द्वारे केले जाते. मात्र RBI ने वाढवलेली दैनंदिन व्यवहार मर्यादा SMS आणि IVRS ला लागू होत नाही. एसएमएस आणि IVRS द्वारे फक्त 5000 रुपये ट्रान्सफर केले जातात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Money, SBI

    पुढील बातम्या