• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 199 रुपयांत मिळेल CA ची सर्व्हिस, SBI ची खास ऑफर मिळवण्यासाठी अवघे काही तास शिल्लक

199 रुपयांत मिळेल CA ची सर्व्हिस, SBI ची खास ऑफर मिळवण्यासाठी अवघे काही तास शिल्लक

इन्कम टॅक्स डे निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना मोफत टॅक्स रिटर्न भरण्याची संधी देत आहे. वाचा काय आहे ही ऑफर

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank of India) ओळख आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBI नेहमी काही सेवा घेऊन येते, याचा त्यांच्या कस्टमर्सना विशेष फायदा देखील होतो. यामुळेच शनिवारी एसबीआयने एक खास संधी त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने एसबीआय त्यांच्या ग्राहकांना मोफत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची संधी देत आहे. एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. इन्कम टॅक्स डे दिवशी ही संधी मिळत असल्यामुळे तुमच्याकडे ही ऑफर मिळवण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. काय आहे SBI चं ट्वीट? एसबीआयने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, टॅक्सपेयर्सनी YONO वर Tax2win च्या मदतीने रिटर्न फाइल करा.  शिवाय तुम्ही सीएची सर्व्हिस देखील मिळवू शकता. या सेवेसाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क द्यावे लागेल. तसं पाहिलं तर सीएसाठी कमीत कमी शुल्क 549 रुपये आहे, मात्र आज स्पेशल ऑफर मिळते आहे. जाणून घ्या कशाप्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या ऑफरचा तुम्हाला फायदा मिळेल. कशाप्रकारे YONO च्या माध्यमातून फाइल कराल आयटीआर? सर्वात आधी YONO वर लॉग इन करा. यानंतर शॉप अँड ऑर्डरमध्ये जा. त्यानंतर टॅक्स अँड इनव्हेस्टमेंटवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला Tax2Win दिसेल. Tax2Win टॅक्सपेयर्ससाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. याअंतर्गत तुम्हाला टॅक्स रिटर्न फाइल करणं अत्यंत सोपं आहे. एसबीआयचा टॅक्स टू विनसह करार अशी माहिती मिळते आहे की, एसबीआयने टॅक्स टू विनसह करार केला आहे. बँकेच्या YONO App वर देखील ही सुविधा देण्यात आली आहे. याअंतर्गतच तुम्हाला सीएची सुविधा मिळेल. सर्वात आधी YONO वर लॉग इन करा. यानंतर शॉप अँड ऑर्डरमध्ये जा. त्यानंतर टॅक्स अँड इनव्हेस्टमेंटवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला Tax2Win दिसेल. याठिकाणी तुम्ही नवीन पेजवर जाल. याठिकाणी फाइल आयटीआर नाऊचा पर्याय असेल, याठिकाणी File it yourself आणि Get a personal eCA चा पर्याय मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: