SBI ग्राहकांसाठी महत्वाचे! घरबसल्या UPI करता येईल Disable किंवा Enable, वाचा काय आहे प्रक्रिया

अनेकदा छोट्या-मोठ्या पेमेंटकरता यूपीआय (UPI)चा वापर केला जातो. तुम्ही SBI ग्राहक असाल आणि यूपीआय डिसेबल करायचे असेल तर तुम्हाला याकरता शाखेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही

अनेकदा छोट्या-मोठ्या पेमेंटकरता यूपीआय (UPI)चा वापर केला जातो. तुम्ही SBI ग्राहक असाल आणि यूपीआय डिसेबल करायचे असेल तर तुम्हाला याकरता शाखेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 जून: कोरोना काळात (Coronavirus in India) ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक लोकं इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगकडे वळले आहेत. दरम्यान अनेकदा छोट्या-मोठ्या पेमेंटकरता यूपीआय  (UPI) चा वापर केला जातो. तुम्ही SBI ग्राहक असाल आणि यूपीआय डिसेबल करायचे असेल तर तुम्हाला याकरता शाखेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता आणि UPI डिसेबल करू शकता. SBI ने अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही UPI कॅन्सल करू इच्छित असाल तर YONO App च्या साहाय्याने किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ही प्रक्रिया घरबसल्या करू शकता. जाणून घ्या काय आहे ही प्रोसेस नेट बँकिंगच्या माध्यमातून -SBI इंटरनेट बँकिंगवर लॉगइन करा -My Profile सेक्शन उघडा -याठिकाणी तुम्हाला Disable आणि Enable चा पर्याय दिसेल -तुमचं खाते क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर डिसेबल किंवा एनेबल पर्यायावर क्लिक करा हे वाचा-10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं, तपासा मुंबईसह विविध शहरातील आजचा भाव Yono App च्या माध्यमातून -SBI YONO lite या मोबाइल App वर लॉग इन करा -UPI टॅब ओपन करा -Disable/Enable यूपीआय ऑप्शनवर क्लिक करा -तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करून टर्न ऑफचा पर्याय सिलेक्ट करा -तुम्हाला पुन्हा UPI enable करायंचं असेल तर तुम्हाला टर्नऑफच्या जागी टर्न ऑनचा पर्याय निवडावा लागेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: