आजपासून बदलणार बँकेचे आणि ATM चे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

आजपासून बदलणार बँकेचे आणि ATM चे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांनुसार बँक व्यवहारांमध्ये काही नवे बदल, नवे नियम येत आहेत. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर जास्त परिणाम होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मार्च :  मार्च महिन्यापासून बँकेच्या काही गोष्टी बदलणार आहेत. रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांनुसार बँक व्यवहारांमध्ये काही नवे बदल, नवे नियम येत आहेत. तुमचं SBI मध्ये खातं असेल तर जास्त परिणाम होऊ शकतो. 1 मार्च 2020 पासून 5 मोठ्या गोष्टी बदलणार आहेत.

1 मार्चपासून ब्लॉक होऊ शकतं बँक खातं

SBI ग्राहकांसाठी KYC गरजेचं आहे. हे भरलं नसेल तर तुमचं बँक खातं बंदही होऊ शकतं. रिझर्व्ह बँकेनेच KYC करणं गरजेचं केलं आहे.

2. ATM मधून 2 हजार रुपयांची नोट नाही

सरकारी बँक असलेल्या इंडियन बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ज्या ग्राहकांना 2 हजार रुपयांची नोट हवी असेल ते बँकेत जाऊ कॅश घेऊ शकतात पण इंडियन बँकेच्या ATM मधून 2 हजार रुपयांची नोट काढता येणार नाही.

3. GST चा नवा नियम होणार लागू

लॉटरीवर एक मार्चपासून 28 टक्क्यांच्या दराने GST लागेल.

अलर्ट! SBI ग्राहक असाल तर उद्यापर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर खातं होणार फ्रीज

4. SBI च्या ATM कार्डमधून पैसे काढण्याचे नियम बदलले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India)ने ATM कार्डशी जोडलेले नियम जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय ऑनलाइन व्यवहार, कार्डलेस व्यवहार यासाठी ग्राहकांना आपल्या कार्डवर सेटिंग करावं लागेल. हा नवा नियम 16 मार्चपासून बदलणार आहे.

5. स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती

देशातल्या मोठ्या तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती जारी करतात. पण यावेळी ऑइल मार्केटिंग कंपनी इंडेनने स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती 12 फेब्रुवारीलाच वाढवल्या होत्या. सगळ्या महानगरांमध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडरमध्ये 149 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली.

अन्य बातम्या

सुवर्णसंधी! सोनं आणखी 2000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नोटबंदीच्या जुन्या प्रकरणांमुळे भरणार मोदी सरकारची तिजोरी, काय आहे प्लॅन?

Zomato-Swiggy च्या ऑनलाइन फूडवर सरकारची असेल नजर, नियम झाले कडक

First published: February 29, 2020, 4:25 PM IST
Tags: ATM Bank

ताज्या बातम्या