Home /News /money /

घरबसल्या महिन्याला कमवा 60 हजार रुपये, जाणून घ्या SBI ची नवी योजना

घरबसल्या महिन्याला कमवा 60 हजार रुपये, जाणून घ्या SBI ची नवी योजना

जर तुम्हीही घरबसल्या एखादा बिझनेस करण्याचा प्लॅन (How to start business) करत असाल किंवा जर तुम्ही एक्स्ट्रा उत्पन्नाची (Earn money) संधी शोधत असाल तर आज आम्ही अशी एक बिझनेस आयडिया (Business Idea) तुम्हाला सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आरामात दरमहा 60 हजार रुपये कमाई करू शकता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जानेवारी-   जर तुम्हीही घरबसल्या एखादा बिझनेस करण्याचा प्लॅन  (How to start business)  करत असाल किंवा जर तुम्ही एक्स्ट्रा उत्पन्नाची (Earn money) संधी शोधत असाल तर आज आम्ही अशी एक बिझनेस आयडिया (Business Idea) तुम्हाला सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आरामात दरमहा 60 हजार रुपये कमाई करू शकता. ही संधी तुम्हाला SBI (State Bank of India) देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रँचायजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही कमाई करू शकता. एटीएम यंत्र बसवून देणारी कंपनी वेगळी असते. कधीही कोणत्याही बँकेतर्फे एटीएम लावून दिलं जात नाही. बँकेतर्फे काही कंपन्यांना एटीएम लावून देण्याचं कंत्राट दिलं जातं. ज्या प्रत्येक ठिकाणी एटीएम मशीन लावण्याचं काम करतात. चला माहिती घेऊया की, कशाप्रकारे एटीएम फ्रँचायजी घेऊन चांगली कमाई करता येईल. SBI ATM फ्रँचायजी घेण्यासाठी आवश्यक अटी - >> तुमच्याकडे 50-80 स्‍क्वेअर फूट जागा असली पाहिजे. >> दुसऱ्या एटीएमपासून त्याचं अंतर 100 मीटर असलं पाहिजे. >> ही जागा तळमजला आणि चांगली प्रकाशमय असली पाहिजे. >> 24 तास वीज असली पाहिजे. याशिवाय 1 किलोवॅटचं वीजेचं कनेक्शन हवं. >> या एटीएममधून प्रतिदिन जवळपास 300 ट्रांजॅक्‍शन्स होण्याची क्षमता असली पाहिजे. >> ATM च्या जागेला काँक्रिटचं छत असलं पाहिजे. >> व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्‍जेशन सर्टिफिकेट हवं. डॉक्युमेंट लिस्ट- 1. ज्याला फ्रँचायजी घ्यायची आहे त्या व्यक्तीचं आयडी प्रूफ – Aadhaar Card , Pan Card, Voter Card 2. अॅड्रेस प्रूफ – रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल 3. बँक अकाउंट आणि पासबुक 4. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर 5. अन्य डॉक्युमेंट्स 6. जीएसटी नंबर 7. फायनॅन्शियल डॉक्युमेंट्स कसा करता येईल एटीएम शाखेसाठी अर्ज- एसबीआय एटीएमची फ्रँचायजी काही कंपन्या देतात. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. माहितीनुसार, एटीएम मशीन बसवण्यासाठी कंपन्या वेगळ्या असतात. भारतात प्रामुख्याने एटीएम बसवण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM जवळ आहे. त्यामुळे या सर्व कंपन्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन लॉग ईन करून तुम्ही एटीएमसाठी अर्ज करू शकता. ऑफिशियल वेबसाईट- Tata Indicash – www.indicash.co.in Muthoot ATM – www.muthootatm.com/suggest atm.html India One ATM – india1atm.in/rent your space किती करावी लागते गुंतवणूक- टाटा इंडिकॅश यामधील सर्वांत मोठी आणि जुनी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाख रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर फ्रँचायजी देते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटलच्या रूपात जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकूण 5 लाखाची गुंतवणूक असते. किती होईल कमाई- कमाईबाबत बोलायचं झाल्यास प्रत्येक कॅश ट्रँजॅक्शनमागे 8 रूपये आणि नॉन कॅश ट्रँजॅक्शनमागे 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या एटीएममार्फत रोज 250 ट्रँजॅक्शन होत असतील. ज्यापैकी 65 टक्के कॅश ट्रँजॅक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रँजॅक्शन असतील तर तुमची महिन्याची कमाई जवळपास 45 हजार रुपयांच्या आसपास असेल. हेच जर रोज 500 ट्रँजॅक्शन झाल्यास जवळपास 88-90 हजार रूपयाचं कमीशन मिळेल. मग तुमच्याकडूनही वरील अटींची पूर्तता होत असेल तर आजच एसबीआयच्या एटीएम शाखेसाठी अर्ज करा आणि घरबसल्या 60 हजार रूपये कमवा.
    First published:

    Tags: Money, SBI

    पुढील बातम्या