ATM नव्हे तर किराणा मालाच्या दुकानात मिळणार पैसे, SBI ची नवीन सेवा

ATM नव्हे तर किराणा मालाच्या दुकानात मिळणार पैसे, SBI ची नवीन सेवा

आता तुम्ही जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून पैसे घेऊ शकता. ही सेवा फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : आपल्याला कधीही पैशांची गरज पडली तर आपली सोय व्हावी म्हणून एटीएमची प्रणाली सुरु झाली. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी सारखं बँकेत जावं लागत नाही. आता लहान सहान गोष्टी विकत घेताना पैशांसाठी एटीएममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून पैसे घेऊ शकता. ही सेवा फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे.

-एसबीआयच्या प्रीपेड कार्ड होल्डर्सना एसबीआय पॉइंट ऑफ सेल टर्मिनलवर ही सुविधा मिळणार आहे.

-या सुविधेमध्ये कमीत कमी 100 रुपये ते जास्ती जास्त 1 हजार रुपये दरदिवशी काढता येतात. यासाठी दुकानदाराला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

-ट्रान्झॅक्शनसाठी 1 टक्के रक्कम शुल्क म्हणून द्याली लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार हे शुल्क कमीत कमी 7 रुपये 50 पैसे ते जास्तीजास्त 10 रुपये इतकं असेल.

वाचा : LIC पॉलिसीधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 30 नोव्हेंबरपासून बंद होणार अनेक प्लान

-तुम्ही एखाद्या दुकानदाराकडून काही खरेदी केली नाहीत तरीही तुम्ही पॉइंट ऑफ सेलच्या मदतीने पैसे काढू शकता.

-दुकानदाराला दररोज त्याची रोकड बँकेत जमा करण्याची गरज पडणार नाही तसेच वेळेचीही बचत होईल.

-एसबीआयच्या संकेतस्थळावर या सुविधेबाबतची अधिक माहिती उपलब्ध आहे.

वाचा : एका पेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान

वाचा : FD ऐवजी लोक इथे गुंतवतायत पैसे, तुम्हालाही होईल फायदा

Published by: Suraj Yadav
First published: November 19, 2019, 1:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading