SBI अलर्ट! बँकेच्या 42 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, आज नाही मिळणार या सुविधा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI) कोट्यवधी ग्राहकांना एक जरूरी माहिती दिली आहे. बँकेने त्यांच्या काही सेवा 22 नोव्हेंबर 2020 रोजी उपलब्ध नसतील असे सांगितले आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने (SBI) कोट्यवधी ग्राहकांना एक जरूरी माहिती दिली आहे. बँकेने त्यांच्या काही सेवा 22 नोव्हेंबर 2020 रोजी उपलब्ध नसतील असे सांगितले आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआयने (State Bank of India SBI) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की आज 22 नोव्हेंबर 2020 रोजी INB/YONO/YONO लाइट इ. बँकेच्या या सेवा वापरताना ग्राहकांना समस्या येऊ शकते. जर तुम्ही या अ‍ॅपचा वापर करत असाल तर आज ट्रान्झॅक्शन करताना किंवा कोणत्याही प्रकारच्या मोबाइल बँकिंग सुविधेदरम्यान समस्येचा सामना करावा लागू शकतो. मात्र असे झाल्यास ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे. SBI ने ट्वीटवरून दिली माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अशी माहिती दिली आहे की, '22 नोव्हेंबर रोजी INB/YONO/YONO लाइट चा वापर करताना बँक ग्राहकांना काही गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही या अ‍ॅपचा वापर केला तर तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते.' (हे वाचा-सामान्य माणसांचं बजेट बिघडलं! कांदा-बटाट्यानंतर आता खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या) एसबीआयने अशी माहिती दिली आहे की, बँकेकडून ग्राहकांच्या सुविधेसाठी इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपडेट केले जात आहेत. बँकेने यासंदर्भात ग्राहकांना याकरता माहिती दिली आहे जेणेकरून आज त्यांच्या कामाचा खोळंबा होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही SBI ग्राहक असाल आणि आज बँकेशी संबंधित काम मोबाइल app च्या सहाय्याने करायचे ठरवले असाल तर तुम्हाला गैरसौयीचा सामना करावा लागू शकतो. (हे वाचा-LPG सिलेंडरसाठी देखील आहे Insurance Cover, मिळू शकतो 30 लाखांपर्यंत फायदा) घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करता येतो. YONO अॅप वापरून तुम्ही विविध  सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे. चुटकीसरशी करता येतील बँकिंगसंबंधातील ही कामं तुम्हाला तुमच्या एसबीआय खात्यातील बॅलन्स तपासायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 9223766666 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचप्रमाणे SMS च्या माध्यमातून शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 09223766666 या क्रमांकावर BAL असा मेसेज पाठवलात की तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल. याकरता तुमचा मोबाइल क्रमांक एसबीआयमध्ये रजिस्टर्ड असणे अत्यावश्यक आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: