मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FD करतांय तर लक्ष द्या! SBI, Axis, IDFC, Kotak या बँकांमध्ये मिळतोय चांगला व्याजदर, इथे तपासा

FD करतांय तर लक्ष द्या! SBI, Axis, IDFC, Kotak या बँकांमध्ये मिळतोय चांगला व्याजदर, इथे तपासा

Fixed deposit

Fixed deposit

पैसे गुंतवण्याच्या विविध पर्यायांमध्ये मुदतठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट-एफडी (Fixed Deposit- FD) हा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये बचत खात्यापेक्षा (Savings Account) अधिक चांगला परतावा मिळतो.

नवी दिल्ली, 16 जून: पैसे गुंतवण्याच्या विविध पर्यायांमध्ये मुदतठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट-एफडी (Fixed Deposit- FD) हा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये बचत खात्यापेक्षा (Savings Account) अधिक चांगला परतावा मिळतो. त्यामुळे बहुतांश लोक एफडी (FD) करण्यावर भर देतात. चांगला व्याजदर देणाऱ्या बँकेत एफडी करण्याकडे लोकांचा कल असतो, जेणेकरून व्याजाचं उत्पन्न चांगले मिळेल. सध्या काही निवडक बँका एफडीवर सर्वाधिक व्याजदर (Interest Rate) देत आहेत. तिथं गुंतवणूक करून ग्राहकांना चांगला लाभ मिळवता येईल.

बँका सात दिवसांपासून दहा वर्षे मुदतीच्या एफडीची सुविधा देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अॅक्सिस बँक (Axis Bank), आयडीएफसी फर्स्ट बँक (Idfc First Bank) आणि कोटक महिंद्रा बँक (kotak Mahindra Bank) या बँका सध्या चांगला व्याजदर देत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया सात दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या एफडीवर 3.4 टक्क्यांपासून 6.2 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 8 जानेवारी 2021 पासून हे दर लागू झाले आहेत.

- 7 ते 45 दिवसांच्या एफडीसाठी सध्या वार्षिक 2.9 टक्के दरानं व्याज देत आहे.

- 46 ते 179 दिवसांसाठी 3.9 टक्के व्याजदर आहे.

- 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी दिवसांसाठी 4.4 टक्के व्याजदर आहे.

- 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 5.1 टक्के

- 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीकरता 5.3 टक्के व्याजदर आहे.

- 5 वर्ष ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 5.4 टक्के व्याजदर दिला जात आहे.

हे वाचा-1 वर्षाच्या FD वर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा काय आहेत इंटरेस्ट रेट्स

अॅक्सिस बँक

- AXIS Bank 7 ते 29 दिवसांच्या एफडीसाठी वार्षिक 2.50 टक्के दरानं व्याज देते.

- 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी मुदतीसाठी 3 टक्के

- 3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीसाठी 3.5 टक्के

- 6 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी मुदतीकरता 4.40 टक्के

- 15 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीसाठी 5.20 टक्के,

- 2 ते 5 वर्षासाठी 5.40 टक्के

- 5 ते 10 वर्षांच्या मुदतीकरता 5.75 टक्के व्याजदर दिला जात आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक

- ही बँक 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी वार्षिक 2.75 टक्के दरानं व्याज देते.

- 45 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 4 टक्के व्याजदर आहे.

- 91 ते 180 दिवसांसाठी 4.50 टक्के

- 181 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 5.25 टक्के

- 5 ते 10 वर्षांच्या मुदतीकरता 5.75 टक्के व्याजदर आहे.

हे वाचा-EPFO Update: आधार-UAN लिंक करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट, आता ही असणार डेडलाइन

कोटक महिंद्रा बँक

- 7 ते 30 दिवसांसाठी 2.50 टक्के

- 31 ते 90 दिवसांसाठी 2.75 टक्के

- 91 दिवस ते 120 दिवस मुदतीसाठी 3 टक्के

- 180 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के

- 23 महिन्यांच्या एफडीवर 5 टक्के

- 5 ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 5.30 टक्के व्याजदर दिला जात आहे.

First published:

Tags: Fixed Deposit, Investment, Money, SBI, Sbi fixed deposit