नव्या वर्षासाठी SBI ची खास भेट, 1 जानेवारीच्या आधी घ्या खास ऑफरचा फायदा

नव्या वर्षासाठी SBI ची खास भेट, 1 जानेवारीच्या आधी घ्या खास ऑफरचा फायदा

नव्या वर्षात भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त दरात होमलोन देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : नव्या वर्षात भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त दरात होमलोन देणार आहे.

या बँकेचं होमलोन 31 डिसेंबर 2019 पर्यंत घेतंल तर 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. SBI ने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

7.90 टक्के व्याजदराने होमलोन

बँकेच्या ट्वीटनुसार SBI च्या गृहकर्जाचे व्याजदर 8.15 टक्क्यांपासून सुरू होतात पण या ऑफरमध्ये 7.90 टक्के व्याजदराने होमलोन घेता येतं. यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2019 च्या आधी अर्ज करावा लागेल. कर्जाचे कमी व्याजदर 1 जानेवारी 2020 पासून सुरू होतील.

काही मिनिटांत मिळणार कर्जाची मंजुरी

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या ऑफरमध्ये तुम्ही जर YONOSBI च्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या आधी अर्ज केला तर तुम्हाला लगेचच तत्त्वत: मंजुरी दिली जाईल.

बँक देणार काही ऑफर्स

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जावर प्रोसेसिग फी कमी असेल आणि कोणताही हिडन चार्ज नसेल. त्याचबरोबर कर्जाच्या प्रि पेमेंटवर दंडही लागणार नाही.

(हेही वाचा : खूशखबर! 1 जानेवारीपासून मोफत होणार बँकेशी जोडलेल्या या सेवा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Dec 28, 2019 05:10 PM IST

ताज्या बातम्या