खूशखबर! SBI चं होमलोन आणि पर्सनल लोन होणार स्वस्त

खूशखबर! SBI चं होमलोन आणि पर्सनल लोन होणार स्वस्त

बँकेने MCLR मध्ये वाढ किंवा कपात केली तर त्याचा थेट परिणाम नवं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांबरोबरच आणखीही ग्राहकांवर होतो. एप्रिल 2016 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनाही याचा फायदा किंवा तोटा होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना दिलासा देत एक मोठी घोषणा केली आहे. SBI ने 10 नोव्हेंबरपासून MCLR चे दर 0.05 टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे होमलोन, ऑटोलोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहे.

याआधी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर SBI ने MCLR चे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले होते. आता या बँकेने एक वर्षासाठी MCLR चे दर 8.05 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर आणले आहेत. या आर्थिक वर्षात बँकेने सलग सातव्यांदा हे दर कमी केले आहेत.

बँकेने MCLR मध्ये वाढ किंवा कपात केली तर त्याचा थेट परिणाम नवं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांबरोबरच आणखीही ग्राहकांवर होतो. एप्रिल 2016 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनाही याचा फायदा किंवा तोटा होऊ शकतो. त्यामुळे SBI चं होमलोन, ऑटोलोन आणि पर्सनल लोन स्वस्त झाल्यानंतर त्याचा अनेक ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडियाची ही घोषणा महत्त्वाची आहे.

==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या