SBI च्या ग्राहकांना दुहेरी झटका, होमलोनसाठी द्यावी लागणार एवढी फी

SBI ने घरासाठीच्या कर्जावर प्रोसेसिंग फी घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत आणि FD वरचे व्याजदरही कमी केले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 07:46 PM IST

SBI च्या ग्राहकांना दुहेरी झटका, होमलोनसाठी द्यावी लागणार एवढी फी

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : तुम्ही जर SBI कडून होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नीट वाचा. SBI ने घरासाठीच्या कर्जावर प्रोसेसिंग फी घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत आणि FD वरचे व्याजदर कमी केले होते. त्यातच आता सणासुदीच्या दिवसांत SBI च्या ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे.

फक्त होमलोनच नाही तर आता टॉप अप प्लॅन्स, कॉर्पोरेट आणि बिल्डर्सना दिल्या जाणाऱ्या कर्जावरही स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोसेसिंग फी घेणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सगळ्या बँका व्याजदर कमी करत आहेत.  होमलोनवर प्रोसेसिंग फी माफ करण्याची SBI ऑफर 16 ऑक्टोबरला संपणार आहे.

(हेही वाचा : #GoBackModi : पाकिस्तानने रचला मोठा कट, न्यूज 18 ने केला खुलासा)

SBI च्या गृहकर्जासाठी 0.4 टक्क्यांची प्रोसेसिंग फी लागेल. हे शुल्क 10 हजार रुपयांपासून 30 हजार रुपयांपर्यंत असेल. बिल्डरला 5 हजार रुपयांचा फ्लॅट चार्ज द्यावा लागेल.

SBI ने 11 जुलैला एक खास सॉफ्टवेअर लाँच केलं होतं. रेपो रेटनुसार व्याजदरात आपोआप बदल व्हावेत यासाठी हे सॉफ्टवेअर होतं पण एक महिन्यानंतर ते मागे घेण्यात आलं.

Loading...

=================================================================================================

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Oct 11, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...