SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिला इशारा, हा SMS रिकामं करू शकतो तुमचं बँक खातं

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या 42 कोटी ग्राहकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.टॅक्स रिफंडच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असं SBI ने म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 07:05 PM IST

SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिला इशारा, हा SMS रिकामं करू शकतो तुमचं बँक खातं

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या 42 कोटी ग्राहकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.टॅक्स रिफंडच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असं SBI ने म्हटलं आहे. अशा मेसेजमध्ये टॅक्स रिफंडसाठी रिक्वेस्ट देण्याबदद्ल लिहिलेलं असतं. खरंतर अनेक लोकांना असे मेसेज येतायत. त्यामध्ये लिहिलं आहे, या लिंकवर क्लिक करून तुम्ही इनकम टॅक्स रिफंडबदद्लची माहिती घेऊ शकता.

SBI ने ट्वीटमध्ये काय लिहिलं?

SBI ने ट्वीटमध्ये लिहिलं आहे, तुम्हालाही इनकम टॅक्स विभागाच्या नावाने रिफंडसाठी रिक्वेस्ट देण्याचा मेसेज आला आहे का? हा मेसेज फसवा आहे. या मेसेजकडे दुर्लक्ष करा किंवा याबदद्ल त्वरित माहिती द्या.

व्हिडिओतून ग्राहकांना केलं सावधान

या ट्वीटमध्येच SBI ने एक अ‍ॅनिमेटेड व्हिडिओही दिला आहे. यामध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होतेय हे दाखवलं आहे.

Loading...

इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जा

इनकम टॅक्स विभागानेही नुकताच एक इशारा दिला आहे. अशा कोणत्याही फ्रॉडची शिकार बनू नका, असं यात लिहिलं आहे. इनकम टॅक्स विभाग जेव्हा रिफंड जारी करतो तेव्हा तो थेट ग्राहकांच्या बँक खात्यात पाठवला जातो. त्यामुळे अशा मेसेजद्वारे मिळणारी माहिती खोटी आहे हे ग्राहकांनी लक्षात घ्यावं, असं इनकम टॅक्स विभागाने म्हटलं आहे.

==================================================================================

कोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Nov 1, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...