SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

State Bank Of India, SBI - स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी खास सेवा आणतेय. त्यानं ग्राहकांचा बराच त्रास कमी होईल.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी खास सेवा घेऊन आलीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या स्पेशल कस्टमर्ससाठी डोअर बँकिंग सुविधा देतेय. ही सेवा 70 वर्षांहून जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक आणि इनफर्म कस्टमर्स यांच्यासाठी सुरू केली गेलीय. या सेवेत कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसह अनेक सुविधा मिळतात. RBI नं दिलेल्या सूचनांनंतर खास ग्राहकांसाठी ही डोअर स्टेप सेवा सुरू केली जातेय.

काय काय मिळतायत सुविधा?

1. डोअर स्टेप बँकिंग सेवा - यात ग्राहकांना 6 सुविधा मिळतात. त्यात कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकची मागणी करणाऱ्या रिसिटचं पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी, टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेट पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी फाॅर्म 15H पिकअप या सेवांचा समावेश आहे.

आता घरमालक उगाचंच भाडं वाढवू शकणार नाही, भाडेकरूंसाठी 'या' नव्या योजना

2. असा घ्या सेवेचा लाभ - डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा केवायसी खातेधारकांनाच मिळेल. शिवाय ज्यांचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर बँकेकडे आहे आणि जे SBIच्या होम ब्रँचपासून 5 किमीच्या अंतरात राहतात, त्यांना या सेवेचा लाभ मिळू शकतो. जाॅइंट अकाउंट, लहान मुलांचं खातं आणि नाॅन पर्सनल खातं यांना ही सुविधा मिळणार नाही.

खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात घसरण, 'हा' आहे नवा दर

3. द्यावी लागेल फी - योग्य ग्राहकांना या सेवेची फी द्यावी लागेल. जर आर्थिक ट्रॅन्झॅक्शन असेल तर प्रति ट्रॅन्झॅक्शन 100 रुपये द्यावे लागतील. नाॅन फायनॅन्शियल ट्रॅन्झॅक्शन असेल तर 60 रुपये फी द्यावी लागेल.

ही आहेत जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं, भारताचा कितवा नंबर?

ही सेवा हवी असेल तर होम बँचमध्ये जाऊन सांगावं लागेल. दिव्यांग ग्राहकांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services इथे क्लिक करा.

VIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या

First published: July 16, 2019, 12:16 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading