SBI बद्दल काही तक्रारी असतील तर 'अशा' प्रकारे करा दूर

SBI बद्दल काही तक्रारी असतील तर 'अशा' प्रकारे करा दूर

बँकेबद्दल काही तक्रारी असतील तर ग्राहक त्या सांगू शकतील आणि सेवांबद्दल स्वत:ची मतं मांडू शकतील.

  • Share this:

मुंबई, 25 मे : तुमचं स्टेट बँक आॅफ इंडियात खातं आहे. तुम्हाला खात्यासंदर्भात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. पण आता तुमची चिंता मिटणार आहे. तुमच्या समस्या निवारण्यासाठी SBI चे मोठे अधिकारी तुम्हाला भेटायला येणार आहेत. बँक 28 मे रोजी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहक संमेलन आयोजित करणार आहे. बँकेचे वरिष्ठ अधिकारी यात भाग घेतील. यावेळी ग्राहक बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतील. ते बँकेबद्दल काही तक्रारी असतील तर सांगू शकतील आणि सेवांबद्दल स्वत:ची मतं मांडू शकतील.

LIC मध्ये अधिकारी पदांसाठी 1753 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

28 मे रोजी बँक अधिकारी तुमच्याशी संवाद साधतील

बँकेनं सांगितलं की त्यांना ग्राहकांच्या तक्रारी समजून घ्यायच्यात आणि आपल्या सेवा चांगल्या करायच्यात.

आता डिलिव्हरी अ‍ॅप सोडा, गुगलवरूनच करा 'अशी' जेवणाची ऑर्डर

बँक आपल्या 17 स्थानिक मुख्य कार्यालयांद्वारे 500हून अधिक ठिकाणी हा समारंभ आयोजित करणार आहे.

बँकेचं लक्ष्य एका लाखाहून अधिक ग्राहकांशी संपर्क साधायचाय.

न्यूज 18 आणि IPSOS चा सर्व्हे ठरला अचूक, प्रत्यक्ष मतदारसंघांत जाऊन असा केला सर्व्हे

बँकेचे रिटेल अँड डिजिटल बिझनेसचे एमडी पी. के. गुप्ता यांनी सांगितलं, ' ग्राहकांचा बँकेबद्दलचा विश्वास पक्का व्हावा म्हणून आम्ही हे आयोजन करतोय.'

ते पुढे म्हणाले, आमच्या या कार्यक्रमाला लोक उदंड प्रतिसाद देतील. यामुळे ग्राहकांचा विश्वास नक्कीच वाढेल.

VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

First published: May 25, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading