Home /News /money /

SBI ग्राहक आहात? घरबसल्या बँक देतेय या 8 सुविधा, असा घेता येईल फायदा

SBI ग्राहक आहात? घरबसल्या बँक देतेय या 8 सुविधा, असा घेता येईल फायदा

स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलच्या (Internet Banking Portal) माध्यमातून ग्राहक घरबसल्या अनेक कामं करू शकतात, त्यासाठी त्यांना बँकेत जाण्याची गरज भासत नाही.

नवी दिल्ली, 23 जुलै: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India-SBI) मधील ग्राहकांची संख्या जवळपास 46 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या आपल्या ग्राहकांना बँक अत्याधुनिक सुविधा पुरवत असते. त्यामुळे सध्याच्या काळातही बँकेचे ग्राहक घरबसल्या आपले महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करू शकत आहेत. स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलच्या (Internet Banking Portal) माध्यमातून ग्राहक घरबसल्या अनेक कामं करू शकतात, त्यासाठी त्यांना बँकेत जाण्याची गरज भासत नाही. इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या करता येतील ही कामं - - पैशाचं हस्तांतरण (Money Transfer) - एटीएम कार्डसाठी अर्ज करणं (ATM) - ठेव खात्याशी संबंधित काम (FD relates works) - बिलं भरणे (Bill Payment) - बचत खात्याचं स्टेटमेंट घेणं (Savings Account Statement) - चेक बुकसाठी अर्ज करणं (Cheque Book Request) - यूपीआय सुरू करणं किंवा बंद करणं (Activate UPI) - कर भरणं (Tax Payment) इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी - यापूर्वी खातेदारांना नेट बँकिंग सुविधेसाठी बँकेच्या शाखेत जाऊन एक फॉर्म भरावा लागत होता. मग प्री-प्रिंटेड किटची वाट पाहावी लागत होती. आता यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही, घरातूनच नोंदणी करता येते. हे काम पूर्णपणे ऑनलाइन करता येतं. - स्टेट बँकेच्या नेट बँकिंग होमेपेज onlinesbi.com वर जा. - त्यानंतर ‘New User Registration/Activation’वर क्लिक करा. - खातं क्रमांक, सीआयएफ क्रमांक, शाखा कोड, देश, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, आवश्यक सुविधा ही माहिती भरा आणि submit बटणावर क्लिक करा. - यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. - आता एटीएम कार्ड निवडा आणि तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर बँक पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. - तात्पुरता युजरनेम आणि लॉगइन पासवर्ड तयार करा. पासवर्ड कन्फर्म करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी submit वर क्लिक करा. - आता तात्पुरता युजरनेम आणि लॉगइन पासवर्डने लॉगइन करा. - आपल्या आवडीचे युजरनेम तयार करा. हे युजरनेम कायमसाठी असेल. - अटी आणि शर्ती स्वीकारल्यानंतर लॉगइन पासवर्ड आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करुन, काही प्रश्न आणि त्याची उत्तर तयार करा. - जन्मतारीख, जन्म स्थान आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक भरा. - बँक खात्याचा तपशील पाहण्यासाठी ‘अकाउंट समरी’वर क्लिक करा. - तुम्ही ‘View only right’ रजिस्टर केलं असेल, तर तुमच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या प्रिंटआउटसह ‘Transaction right’ कार्यान्वित करण्यासाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा. Gold Price Today: आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण, पाहा काय आहे गोल्ड रेट तुम्ही आधीपासून ही सेवा वापरत असाल आणि पासवर्ड विसरला असाल तर - 1. www.onlinesbi.com वर भेट द्या. 2. ‘फरगॉट लॉगइन पासवर्ड’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘नेक्स्ट’वर क्लिक करा. 3. आता तुमचं नेटबँकिंगचं युजरनेम, खातं क्रमांक, देश, नोंदणीकृत मोबाइल नंबर, जन्म तारीख आणि कॅप्चा सबमिट करा. 4. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तो भरा आणि कन्फर्मवर क्लिक करा. 5. आता लॉगइन पासवर्ड रिसेट करण्यासाठी एटीएम कार्ड डीटेल्स, प्रोफाइल पासवर्ड असे पर्याय येतील. 6. प्रोफाइल पासवर्डशिवाय लॉग इन पासवर्ड रिसेट करावा.
First published:

Tags: SBI, Sbi account, SBI Bank News

पुढील बातम्या