Home /News /money /

ग्राहकांनो लक्ष द्या! बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी या चुका करणं टाळा, SBI चा इशारा

ग्राहकांनो लक्ष द्या! बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी या चुका करणं टाळा, SBI चा इशारा

देशामध्ये ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहेत. सायबर क्राइमच्या केसेस वाढत असल्याने देशातील सर्वात मोठी बँक असणारी SBI वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना याबाबत अलर्ट करत असते. एसबीआयने अशा काही फसवणुकींपासून वाचण्याचे उपायही सांगितले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना बँकेने सावधान केले आहे.  बँकेने ग्राहकांना असे कोणतेही काम करण्यास नकार दिला आहे ज्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागेल. कोरोना काळापासून देशात ऑनलाईन फसवणूक आणि सायबर क्राइमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हे घोटाळे टाळण्यासाठी बँक आणि सरकार वेळोवेली अ‍ॅलर्ट जारी करत आहे. बँक आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे किंवा मेसेजिंगद्वारे त्यांच्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांना सावधान करते आणि यापासून वाचण्याचे उपायही सांगते. SBI ग्राहकांना बँकेने अशी सूचना दिली आहे की, बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी एटीएम व्यवहार पूर्ण गोपनीयतेने केले पाहिजेत. एटीएममधून (ATM) रोख रक्कम काढणे तसे सोपे आणि सोयीचे आहे, परंतु त्यासंबंधित फसवणुकीच्या बातम्याही वेळोवेळी येत असतात. अशा परिस्थितीत डेबिट किंवा एटीएम कार्ड सुरक्षित पद्धतीने वापरणे आणि एटीएममधून व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा या बाबी -एटीएम किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना तुमच्या मोबाइल फोन कधीही अनलॉक ठेवू नका -मोबाइलमध्ये वापरात नसलेले Apps किंवा कनेक्शन देखील सुरू ठेवू नका. (हे वाचा-FD मुदतीआधी मोडायचीय? पण दंडही टाळायचाय? मग हे पर्याय वाचा!) -अनोळखी आणि पासवर्ड नसलेल्या नेटवर्कशी तुमचा मोबाइल फोन कनेक्ट करू नका -संवेदनशील माहिती जसे की पासवर्ड, युजरनेम अशा गोष्टी मोबाइलमध्ये लिहून ठेवू नका -व्हायरसची भीती असल्यामुळे शक्यतो एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये डेटा ट्रान्सफर करणं टाळा फसवणुकीची शिकार झाल्यास काय कराल? एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, जर कोणत्याही या प्रकारच्या फसवणुकीचे ते शिकार झाले तर ते सरकारच्या नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची तक्रार तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये देखील करू शकता. एटीएम संदर्भाक एखादा फ्रॉड झाल्यास किंवा बँकिंगशी संबंधित कोणतीही फसवणूक झाल्यास तुम्ही तुमच्या बँक शाखेशी संपर्क करू शकता. तुमचे कार्ड बंद करण्यासाठी बँकेकडून मदत केली जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank

    पुढील बातम्या